गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज जारी केला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेण्यात आवाहन करण्यात आले आहे. महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाला सुरुवात झाली आहे.
हवामान अंदाजानुसार (Weather Update) आज कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीमहाराजनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, मराठवाडामध्ये देखील पावसाची शक्यता असल्याने मराठवाड्यातील शेतकरी बांधवांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे. यानंतर हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी देखील आपला हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) सांगितला आहे. ते म्हणाले, आजपासून राज्यात अतिवृष्टी होणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात दहा सप्टेंबर पर्यंत अतिवृष्टी होणार आहे.
Pune Rain Alert: मुसळधार! बारामतीमध्ये ढगफुटी, पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या माणसाला वाचवले..
अनेक ठिकाणी वीज पडण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी यादरम्यान आपली व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी असे आवाहन पंजाबराव यांनी केले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळित होणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे येणारे चार दिवस महत्वाचे आहेत.
गॅसच्या किमती कमी करून मोदी सरकार देणार सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट? घेतला मोठा निर्णय..
दरम्यान, 18 सप्टेंबरपर्यंत कोसळणारा पाऊस हा विजांच्या कडकडाटासह कोसळणार असून अनेक ठिकाणी वीज पडण्याची शक्यता आहे. यामुळे आता शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या;
आयकरच्या धाडीनंतर अभिजीत पाटलांचा मोठा निणर्य, २ वर्षापासून थकीत असलेली 30 कोटींची बिलं देण्यास सुरुवात..
तुळशीच्या लागवडीने बदलले शेतकऱ्यांचे नशीब, आता स्वतःची कंपनी करणार सुरू
'वारंवार सांगूनही माझ्या खात्यावर पैसे यायचे थांबत नाहीत आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांनी हेलपाटे घातले तरी त्यांचे पैसे येत नाहीत'
Share your comments