1. बातम्या

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादीचे अशोक डग

KJ Staff
KJ Staff


देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक डग यांची  निवड झाली आहे तर उपसभापतीपदी काँग्रेसचे धनंजय वाडकर  यांची बिनविरोध निवड झाली आहे.

महाविकासाआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी  एकत्रितपणे निवडणूक लढवली  होती. त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा सुफडा साफ झाला होता. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष  यांनी एकत्र निवडणूक लढवली होती. निवडणुकीतील १८ पैकी १६ जागांवर महाविकास आघाडीचा पॅनल जिकून आला. त्यामध्ये १ शिवसेनेचा, ४ काँग्रेसचे आणि ८ राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. कोरोनामुळे सभापती आणि उपसभापतीसाठी निवड रखडली होती. सर्वात जास्त जागा आल्यामुळे राष्ट्रवादीने सभापतिपद आपल्याकडे ठेवले तर काँग्रेसला  उपसभापतिपद देऊ केले आहे. यामुळे  राष्ट्रवादी काँग्रेसची सहकार क्षेत्रावरील पकड अधिकच मजबूत झाली आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters