आता सध्या मान्सून चा काळ सुरु आहे. मान्सून संपला की हिवाळा सुरु होईल. हिवाळ्याच्या आगमनासोबत पैसे कमवायची संधीही तुम्हाला मिळेल.काही व्यवसाय असे आहेत जे की वर्षभर चालतात परंतु थंडीमध्ये जास्त कमाई करून देतात. इथं अशाच एका व्यवसायाबद्द्ल माहिती घेऊया कि ज्यातून तुम्ही प्रतिमहा लाखो रुपये कमावू शकता.
काय आहे हा व्यवसाय :-
पोल्ट्री फार्म म्हणजेच कुक्कुटपालन हिवाळ्यासाठी चांगला व्यवसाय आहे. सध्या देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दर 100 अंड्यांचा प्रति दर 420 ते 500 रुपयांइतकी आहे. कुक्कुटपालक चांगला नफा कमवत आहेत.असे बोलले जात आहे की पाच वर्षात पहिल्यांदाच या व्यवसायात सर्वाधिक नफा दर्शविला जात आहे. व्यापाऱ्याच्या म्हणण्यानुसार फेब्रुवारीपर्यंत हा व्यवसाय कार्यरत राहील व नफा मिळवत राहील.
प्रतिमहिना 1 लाख कमवा :-
पोल्ट्री व्यवसायाशी संबंधित तज्ज्ञांचे म्हणणे आहे की हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला पाच लाख ते नऊ लाखाची गुंतवणूक करावी लागेल.आपण आपला व्यवसाय दीड हजार कोंबड्यांसह सुरूवात करू शकतो , त्यामुळे आपल्याला प्रतीमहिना पन्नास हजार ते 1 लाखानपर्यंत उत्पन्न मिळेल.
आपला व्यवसाय अशा प्रकारे सुरू करा :-
जर तुम्हाला कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू करायचा आहे तर तुम्हाला पिंजरे व इतर सामानावर पाच ते सहा लाखाची गुंतवनुक करावी लागेल. कोंबड्यांच्या पिंजरा या व्यतिरिक्त, लेयर पैरेंट बर्थ, अन्न आणि औषधे यासाठी हिशोब ठेवा.अंडी देणाऱ्या कोंबड्याची संख्या कमी आहे, तर मागणी वाढत आहे. यामुळे कुक्कुटपालन करणारे जोरदार उत्पन्न कमवत आहे. कोंबड्याची संख्या कमी होण्यामागील प्रमुख कारण हे करोना आहे.जर तुम्हाला पोल्ट्रीचा व्यवसाय सुरु करायचा असेल पण आपल्याकडे गुंतवणुकीसाठी पैसा नसेल तर काळजी करू नका काही बँका आपल्या मदतीसाठी पुढे आल्या आहेत. स्टेट बँक, एचडीएफसी बँक, पीएनबी बँक आपल्याला वेवसाय साठी लोन देत आहेत.
एका वर्षात किती कमाई :-
दीड हजार कोंबड्यांपासुन आपल्याला वर्षात सुमारे साडे चार लाख अंडी भेटू शकतात. जरी त्यात काही अंडी वाया गेली खराब असतील तर आपनास चार लाख अंडी विकता येतील. 1 अंडे 3.5 रुपये दराने विकली तर तुम्हाला वर्षाला 14 लाख रुपये उत्पन्न मिळेल.तज्ञ बोलतात की हा पैसे कमाईचा व्यवसाय आहे, पण आपल्याला माहिती आणि प्रशिक्षण अत्यआवश्यक आहे.
Share your comments