राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याकडे कृषीमंत्र्यांची जबाबदारी आली आहे. यानंतर ते म्हणाले, आज जन्मदिनाच्या दिवशी कृषी खात्याच्या रूपाने या शेतकऱ्याच्या मुलाला विशेष गिफ्ट मिळाले, याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे आभार.
त्यांनी मंत्रालयात जाऊन कृषी विभागाचा आढावा घेतला. मागेल त्याला शेततळे व मागेल त्याला ड्रीप, शेडनेट यांचे प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढावेत असे निर्देश विभागाला देण्यात आले.
त्याचबरोबर विभागातील रिक्त पदांचाही अहवाल मागवला आहे. राज्यात व विशेषकरून मराठवाड्यात पावसाचे प्रमाण अल्प आहे. शेतकऱ्यांनी संभाव्य नुकसान टाळण्यासाठी एक रुपयात पीकविमा अंतर्गत विमा अर्ज तातडीने भरून घ्यावेत.
मोठी बातमी! चिंदरमध्ये विषबाधेने ४१ जनावरांचा मृत्यू...
विमा भरताना कोणतेही ग्राहक सेवा केंद्र पैसे मागत असल्यास त्याची प्रशासनाकडे तक्रार करावी, त्याची तात्काळ दखल घेऊन कडक कारवाई करण्यात येईल. राज्यात बोगस बियाण्यांच्या माध्यमातून कुठेही शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, याबाबतही धडक कारवाया करण्याचे निर्देश विभागाला दिले आहेत.
नव्या शेततळ्यांसाठी ४६ कोटींचा निधी, शेतकऱ्यांना होणार फायदा
कृषी विभागाच्या शेतकरी हिताच्या अनेक प्रभावी योजना आहेत, त्यातील लाभार्थी संख्या वाढविण्यासाठीही आगामी काळात प्रयत्न केले जातील. पेरणी पासून ते पिकाला योग्य भाव मिळवून देण्यापर्यंत सरकारची जबाबदारी निष्ठेने पार पाडून विभागाची प्रतिष्ठा वाढेल, असे कार्य सर्वांच्या सहकार्यातून नक्कीच करून दाखवू, असा विश्वास आहे.
टोमॅटोचे भाव पडले त्यावेळी कुठं गेले होते आता ओरडणारे...?
गुणवत्तेमुळे शंभर रोपवाटिकांची मान्यता रद्द, शेतकऱ्यांना फसवणे आले अंगलट...
पशुधन खरेदीसाठी बँका देतात फक्त ४ टक्के व्याजाने कर्ज, असा करा अर्ज...
Share your comments