राज्यात हवामान विभागाने पुढील काळातही अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यामुळे राज्यात काही जिल्ह्यांतील ३८ लाख शेतकऱ्यांनी पिके सुरक्षित केली असली तरी अखेरची मुदत संपल्याने या प्रक्रियेतून ६२ लाख शेतकरी बाद झाले आहेत. पैशाची चणचण आणि विमा मिळण्याची शाश्वती नसल्याने एक कोटी खातेधारकांपैकी ६२ टक्के
शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागच घेतला नाहीFarmers did not participate in this scheme..मुख्यमंत्र्यांनी काही नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली; परंतु मदतीची घोषणा केेली नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांकडे पीक विमा काढणे हाच मोठा आधार होता. केंद्राने त्यासाठी १ ऑगस्ट पर्यंतची मुदत दिली होती.अखेरच्या दिवसापर्यंत राज्यातील ३८ लाख ४३ हजार ७२४ शेतकऱ्यांनी विमा काढल्याची नोंद आहे.
राज्यात शेतकरी खातेधारकांची संख्या एक कोटी आहे. त्यापैकी ३८ टक्के शेतकऱ्यांनी विमा काढला. या शेतकऱ्यांनी २९६ कोटी ५७ लाख ५४ हजार १५१ रुपयांची रक्कम भरली. मात्र, ६२ लाख शेतकऱ्यांनी विम्याकडे पाठ फिरविली आहे.अहवालच तयार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक घेत तत्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना
दिल्या. १ ऑगस्टपर्यंत अहवाल तयार होणे अपेक्षित होते. मात्र, नुकसानच मोठे आहे. सर्वेक्षण करताना अडथळे येत आहेत. त्यामुळे अहवाल रखडला आहे.जिल्हा शेतकरी संरक्षित क्षेत्रयवतमाळ ३ लाख ९९ हजार ३ लाख हेक्टरअमरावती २ लाख १५ हजार १ लाख ९१ हजार हेक्टर
औरंगाबाद ७ लाख २८ हजार ३ लाख ११ हजार हेक्टरभंडारा १ लाख २७ हजार ५५ हजार हेक्टरबुलडाणा ३ लाख ४९ हजार २ लाख ७७ हजार हेक्टरगडचिरोली २४ हजार १६ हजार हेक्टरजळगाव १ लाख ३५ हजार १ लाख २८ हजार हेक्टरलातूर ७ लाख ३७ हजार ५ लाख हेक्टर
नंदुरबार ८ हजार ६ हजार हेक्टरउस्मानाबाद ६ लाख ६८ हजार ५ लाख हेेक्टरपालघर १९ हजार ३७५ १० हजार ८५ हेेक्टररायगड ६ हजार २ हजार हेक्टरसांगली २३ हजार १३ हजार हेक्टरसातारा ३ हजार १ हजार हेक्टरसोलापूर १ लाख ९५ हजार १ लाख ६२ हजार हेक्टरनाशिक २ लाख १ लाख ६२ हजार हेक्टर
Share your comments