1. बातम्या

कोरोना व्हायरसची लागण होण्यापासून वाचवेल 'आरोग्य सेतू अॅप'

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने आरोग्य सेतू (Arogya Setu app) नावाचे अॅप लॉन्च केले आहे. चुकून आपण व्हायसरने संक्रमित व्यक्तीच्या जवळ गेल्यास हे अॅप आपणास सतर्क करेल. या अॅपमुळे कोविड-19 संक्रमणाबाबत आकलन करणे आणि गरज वाटल्यास लोकांना सेल्फ आयसोलेशनबाबत सूचना देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना मदत होईल, असे नॅशनल इंफर्मेटिक्स सेंटरच्या अधिकारी नीता वर्मा यांनी सांगितले आहे.

KJ Staff
KJ Staff


कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने आरोग्य सेतू (Arogya Setu app) नावाचे अॅप लॉन्च केले आहे.  चुकून आपण व्हायसरने संक्रमित व्यक्तीच्या जवळ गेल्यास हे अॅप आपणास सतर्क करेल.  या अॅपमुळे कोविड-19 संक्रमणाबाबत आकलन करणे आणि गरज वाटल्यास लोकांना सेल्फ आयसोलेशनबाबत सूचना देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना मदत होईल, असं नॅशनल इंफर्मेटिक्स सेंटरच्या अधिकारी नीता वर्मा यांनी सांगितले आहे.

हे अॅप गुगल प्ले स्टोरवरून डाऊनलोड केले जाऊ शकते. हे अॅप युझरच्या फोनचे ब्लुटूथ, लोकेशन आणि मोबाईल नंबरचा उपयोग करून तो व्यक्ती कोरोना बाधितांच्या संपर्कात तर आला नाही ना? या गोष्टी ट्रेस करते.  जर एखादी व्यक्ती कोरोना व्हायरस संक्रमित असल्याचे आढळला. तर संक्रमित व्यक्तीचा मोबाईल नंबर स्वास्थ मंत्रालयाद्वारे बनविण्यात आलेल्या एका रजिस्टरमध्ये टाकण्यात येईल. त्यानंतर या अॅप याविषयीचे अपडेट केला जाईल. दरम्यान आतापर्यंत देशात एकू २ हजार ६३९ जण कोरोनाने बाधित झाले आहेत. तर जगातून साधारण ५० हजार लोकांचा मृत्यू या विषाणूमुळे झाला आहे. भारतात आतापर्यंत ५० जणांचा मृत्यू झाला आहे. आता आरोग्य सेतू नावाचं अॅप सरकारने लॉन्च केले आहे.  हे अॅप कोरोना ट्रेकर आहे. या माध्यमातून आपण घरबसल्या आपल्याला कोरोना आहे की नाही हे तपासू शकता.

आरोग्य सेतू अॅपचा असा करा वापर
आरोग्य सेतू अॅप वापरण्यासाठी आपला फोन नंबर रजिस्टर करा.
फोन नंबर टाकल्यावर एक ओटीपी येईल. जो इंटर केल्यावर अपमध्ये रजिस्ट्रेशन होईल.
हे एक कोरोना व्हायरस ट्रॅकिंग अॅप आहे.
इंटर झाल्यानंतर अॅप आपल्याला ब्लूटूथ आणि जीपीएस अॅक्सेस विचारते.
आपल्या डिव्हाईसमधून युझरचा डेटा अनक्रिप्टेड फॉर्ममध्ये घेतला जातो.
अॅप उघडल्यानंतर पर्सनल डिटेल्स विचारली जातात. यामध्ये जेंडर, नाव, वय, व्यवसाय आणि मागील 30 दिवसांच्या ट्रॅव्हल हिष्ट्रीबाबत विचारलं जातं. अर्थात या माहितीला आपण स्कीप देखील करू शकतो.
यानंतर अॅपची भाषा निवडावी लागते
अपमध्ये सर्व राज्यांमधील हेल्पलाईन नंबर्सची लिस्ट दिली आहे.
आपल्याला वाटल्यास आपण या संकटकाळात स्वतःला स्वयंसेवक म्हणून रजिस्टर करू शकता.
या अॅपमध्ये इस युझर आपले सेल्फ असेसमेंट करू शकतात.

काय आहेत खास फीचर्स
आरोग्य सेतु अॅपमध्ये दोन खास फीचर्स आहेत. यात राज्यवार कोविड-19 हेल्पलाईन नंबर्सची लिस्ट दिली आहे.
तसेच दुसरे म्हणजे सेल्फ असेसमेंट. या फिचरद्वारे आपण स्वतःची चाचणी करू शकतो. यातून तुम्हाला कोरोना धोका आहे की नाही हे लक्षात येण्यास मदत होते. जर तुमच्यामध्ये कोविड-19 ची काही लक्षणे असतील तर हे अॅप तुम्हाला सेल्फ आयसोलेशनसाठी निर्देश देतं.
महापालिकांना क्वॉरन्टाईन रुग्णांची माहिती घरबसल्या मिळणार.
अॅप डाऊनलोड करताना काळजी घ्या गुगल प्ले स्टोरवर ‘AarogyaSetu’ असे टाईप करा. हे अॅप NIC (नॅशनल इन्फर्मेटिक सेंटर) ने बनवले आहे. प्ले स्टोरवर याच प्रकारचे काही बोगस अॅप देखील आहेत. त्यामुळे NIC ने पब्लिश केलेले अॅपच घ्या.

English Summary: Arogya Setu app help to save from corona virus Published on: 03 April 2020, 06:03 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters