शेतकऱ्यांवरील (Farmers) संकटांची मालिका थांबताना दिसत नाही. कारण गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊसाने (Heavy Rain) शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. पावसाने कुठेतरी उघडीप देताच खरीप पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव (Outbreak of disease) झपाट्याने वाढायला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना आसमानी संकटांनी चुहीकडून घेरले आहे.
राज्यातील काही भागात सुरुवातीला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप पिकांची (Kharip Crop) पेरणी केली मात्र नंतर पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांची पिके वाळून गेली त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले. दुबार पेरणी केल्यानंतर शेतकऱ्यांची पिके मुसळधार पावसामध्ये सापडली आणि आता त्यावर लष्करी अळीचा (Army worm) प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे.
यवतमाळ येथील शेतकऱ्यांच्या सोयाबीन (soybean) पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. लष्करी अळी सोयाबीन पिकाच्या पानांची आणि शेंगाची मोठ्या प्रमाणात नासाडी करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
EPFO: पीएफचे पैसे जमा झाले नाहीत? टेन्शन घेऊ नका, अशी करा सोप्या मार्गाने तक्रार...
पीक परिस्थिती सुधारित असताना सततधांर पावसामुळे व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे कृषी विभागाने पाहणी केली. शेतकरी हा दोन महिन्यापासून संततधार पाऊस असल्याने चिंतेत होता. यामध्ये पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
अनेकांच्या शेतात जमिनीसह पिके वाहून गेली आहेत. या नैसर्गिक संकटामुळे पिकांची अवस्था दयनीय झाली आहे. हे संकट काहीसे दूर होत नाही तर तालुक्यात वन्यप्राण्यांकडून पिकांची नासाडी करण्यात आली.
BEL Recruitment 2022: बेलमधील अभियांत्रिकी सहाय्यकांसह विविध पदांसाठी भरती; जाणून घ्या तपशील...
पीक वाचवण्याकरिता शेतकऱ्यांना अतोनात प्रयत्न करावे लागत आहे.पिकांची परिस्थिती चांगली असतानाच सोयाबीन पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे आहे.
कीटकनाशकाची फवारणी करूनही लष्करी अळी नष्ट होत नाही. त्यामुळे पीक हाताला येईल की नाही याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. नुकसान ग्रस्त शेतीचे कृषी विभाकडून सरसकट पंचनामे करण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
Tata Motors: टाटा मोटर्स सीएनजी कारसह अनेक गाड्यांवर देत आहे बंपर सूट; जाणून घ्या सविस्तर
पावसाची उघडीप! खरीप हंगामातील पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
Share your comments