ग्रामीण भागात जोडव्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यातून दूध उत्पादकांना चांगला नफा मिळत असतो. मात्र आता राज्यात खासगी डेअरीचालकांनी दुधाचे खरेदीदर प्रतिलिटर दोन रुपयांनी घटवले आहे. शेतकऱ्यांकडून जे दूध पुरवले जात होते त्या गायीच्या दुधाचे खरेदीदर घटवण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सहकारी दूध संघांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
सध्या राज्यात दुधाचा पुरवठा कमी आहे तसेच पशुखाद्यातील वाढदेखील कायम आहे. असं असताना खरेदीदर कमी करण्यात आल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. "गायीच्या दुधाचे खरेदीदर प्रतिलिटर ३५ रुपयांपर्यंत गेले होते. परंतु एक मेपासूनच काही खासगी डेअरीचालकांनी खरेदीदर कमी करण्यास सुरुवात केली असून शेतकऱ्यांना आता प्रतिलिटर ३३ रुपये खरेदीदर दिला जातोय.
त्यामुळे नाइलाजास्तव सहकारी संघांनाही दरात कपात करावी लागत आहे.’’ असं वक्तव्य राज्याच्या दूध उत्पादक व व्यवसाय प्रक्रिया कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांनी केले आहे. एकीकडे शेतकरी आणि सहकारी दूध संघांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे मात्र दुसरीकडे खासगी डेअरीचालकांनी खरेदीदराच्या कपातीचे समर्थन केले आहे.
सध्या दूध भुकटी व लोण्याचे दर घसरले आहेत. त्यामुळे खरेदीदर कमी करणं भाग होतं असा दावा डेअरीचालकांनी दिला आहे. ‘‘बाजारात दूध भुकटीचे दर हे प्रतिकिलो ३० रुपयांनी, तर लोण्याचे दरदेखील प्रतिकिलो ४० रुपये इतके खाली आले आहे. आणि म्हणूनच शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या खरेदीदरात कपात करावी लागली आहे,’’ असे म्हस्के यांनी सांगितले आहे.
महादेव जानकरांनी थेट गाईच्या धारा पिळत मांडले दुग्ध व्यवसायातील आर्थिक गणित, वाचा..
अचानक कमी झालेला खरेदीदर दूध उत्पादक शेतकऱ्यांसह सहकारी संघांच्या प्रतिनिधी यांना रुचलेला नाही. ‘‘नफ्यासाठी शेतकऱ्यांना खासगी डेअरीचालक वेठीस धरतात. स्थिर भाव दिल्यास दुधाच्या धंद्यात स्थिरता येते असे शेतकऱ्यांना वाटते त्यामुळे ते गोठा व्यवस्थापनात अधिक गुंतवणूक करतात. मात्र भावात सतत चढ-उतार केल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडते.
त्यातून भेसळीचे प्रमाण वाढते आणि डेअरी उद्योगाविषयी शेतकऱ्यांमध्ये नकारात्मक संदेश जातो,’’ असे एका सहकारी दूध संघांच्या पदाधिकाऱ्याने म्हटले आहे. खासगी डेअरीचालकांनी खरेदीदर घटवल्यामुळे पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (कात्रज) लगेचच २१ मेपासून गाय दुधाचे खरेदीदर प्रतिलिटर ३५ रुपयांवरुन ३३ रुपये करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या:
आता निसर्गानेही सोडली शेतकऱ्यांची साथ, अतिरिक्त ऊसावर पावसाची अवकृपा
Share your comments