1. बातम्या

पंधरा हजार टन कांदा आयातीसाठी मंजुरी; ग्राहकांच्या आवडीनुसार कांदा येणार बाजारात

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


नाफेडने १५ हजार टन कांदा आयात करण्यासाठी  आयातदार (बीडर) निश्चित केले आहेत. शिवाय आयातीचे आदेशही  जारी करण्यात आले आहेत.कांद्याचे वाढते भाव नियंत्रात ठेवण्यासाठी  ही आयात करण्यात येत आहे.आयात केलेला कांदा नाफेडहून बंदर असलेल्या शहरात पुरविला जाईल.राज्यांनी आपआपली गरज नोंदविण्याचे आवाहन नाफेडतर्फे करण्यात आले आहे.कांद्याच्या अतिरिक्त पुरवठ्यासाठी नियमित निविदा जारी करण्याची नाफेडची योजना आहे. एका अधिकाऱ्याच्या मते तुतीकोरीन आणि मुंबई बंदरांवर कांदा पुरविण्यासाठी जारी करण्यातच आलेल्या नाफेडच्या निविदांना चांगाल प्रतिसाद मिळाला आहे.

नाफेडने तातडीने संध्याकाळपर्यंतच निविदा मंजूर केल्या. कांदा वेळेवर बाजारात उपलब्ध व्हावा,असा नाफेडचा प्रयत्न आहे. दरम्यान निविदा जारी करताना नाफेडने भारतीय ग्राहकांच्या आवडी-निवडीचा आग्रह धरला आहे. भारतीय ग्राहक मध्यम आकाराच्या कांद्याला प्राधान्य देतात. विदेशी  कांदा साधरणपणे ८० मि.मी.पेक्षा जास्त मोठा असतो.असा कांदा यंदा आयात केला जाणार आहे.तशी अट  निविदांत घालण्यात आली आहे.गेल्यावर्षी एमएमटीसीने तुर्कस्तान आणि इजिप्तमधून पिवळा , गुलाबी आणि लाल कांदा आयात केला होता, या कांद्याचा आकार मोठा होता. दरम्यान, कांदा दरवाढ नियंत्रणात आणण्यासाठी इजिप्त,तुर्कस्तान, इराण येथून कांदा आयातीचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यामुळे परदेशातील कांदा दिवाळीत बाजारात मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध होणार आहे. या कांद्याची प्रतवारी महाराष्ट्रातील कांद्याएवढी नसली तरी सामान्यांना कमी दरात हा कांदा उपलब्ध होईल.

 


त्याबरोबरच मध्यप्रदेश पाठोपाठ राजस्थानातील कांद्याची आवकही राज्यात सुरू झाल्यामुळे कांद्याचे दर आटोक्यात यायला सुरुवात झाली आहे. 
किरकोळ बाजारात कांद्याचे प्रतिकिलोचे दर ६० ते ८० रुपयांवर गेल्यामुळे केंद्राने कांदा दरवाढ नियंत्रणात आणण्यासाठी कांदा आयातीचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर इजिप्त, तुर्कस्तान, इराण येथून कांदा मागवण्यात आला असून मुंबईतील बंदरात या कांद्याची आवक झाली आहे.

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters