पिकाचे नुकसान होऊन सुद्धा विमा कंपन्या कोणतेही कारण पुढे करत भरपाई देत नाहीत या विमा कंपन्याचे व केंद्र आणि राज्य सरकारचे साटे लोटे आहेत. सरकारच या विमा कंपन्यांना मदत करते म्हणूनच मालामाल झालेल्या ह्या विमा कंपन्या शेतकऱ्यांना भरपाई न देता उलट विमा रकमे पासुन शेतकऱ्यांना वंचित ठेवतात. कोणताही राजकीय पक्ष शेतकऱ्यांचा वाली नाही म्हणून आता शेतकऱ्यांनी
संघटित होऊन लढाई लढण्याची गरज असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.खा. राजू शेट्टी यांनी आज संग्रामपूर तहसील समोर पार पडलेल्या शेतकरी शेतमजूरांच्या दुष्काळ दखल मोर्चात बोलतांना केले.
हे ही वाचा - लम्पी त्वचारोगावरील लसीकरण मोफत
शेतकरी शेतमजुरांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज भव्य दखल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते बस स्टॅन्ड पासून खा.राजु शेट्टी
विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर, प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांच्या नेतृत्वात १५ ते १६ हजार शेतकऱ्यांचा भर पावसात मोर्चा तहसीलवर पोहोचला व जाहीर सभा सुद्धा पावसातच पार पडली प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले खासदार राजु शेट्टी पुढे म्हणाले शेतकरी शेतमजुरांच नातं हे गाय वासरा सारखा आहे पण सरकार या दोघांमध्ये भांडण लावून स्वतःची पोळी शेकून घेण्याचं काम करत आहे म्हणूनच
भावांनो दोघांचे संबंध चांगले ठेवा ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्या विना अट पिक-विमा मंजुर करा. पंचनामा किंवा सर्वेचे नाटक न करता ओल्या दुष्काळाची मदत द्या.राज्यात स्वतंत्र शेतमजूर कल्याण महामंडळ स्थापन करून मंडळअंतर्गत शेतमजुरांना सर्व सवलती लागु करा.व दरमहा चार हजार रुपये मानधन लागु करा. असे प्रशांत डिक्कर सारखेच
कार्यकर्ते प्रत्येक जिल्ह्यात तयार होतील तेव्हा शेतकरी व शेतमजूरांचे प्रश्न चुटकीत सुटतील म्हणून प्रशांत डिक्कर च्या नेतृत्वाखाली संघटितपणे काम करा असे आव्हान त्यांनी यावेळी केले. विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर बोलतांना म्हणाले की मागील वर्षी सरकार विरोधात असलेले येथील स्थानिक आ.सजंय कुटे महाविकास आघाडीतील सरकारला सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदत मागत होते. आज ते
राज्याच्या सत्तेत आले व पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासकीय यंत्रणेला देत आहेत किती विरोधाभास हा असा टोला प्रशांत डिक्कर यांनी भाषणातून लगावला प्रदेशाध्यक्ष कु.पूजा मोरे यांनी केंद्र व राज्य सरकारचा कारभारावर आसूळ ओढत प्रशांत डिक्कर यांचे हात बळकट करा असे आवाहण त्यांनी यावेळी केले मराठवाडा अध्यक्ष बंगाळे पाटील यांनी बोलतांना सांगितले की राजकीय पक्ष
शेतकऱ्यांचा घात करतात म्हणून शेतकऱ्यांनीच यापुढे स्वाभिमानीच्या बॅनरखाली संघटित होणे हीच काळाची गरज आहे असे सांगितले तत्पूर्वी सम्म्यद पाटील, अनंता मानकर, उज्वल चोपडे,विजय ठाकरे, उज्वल खराटे यांनी मनोगत व्यक्त केले. तहसील समोरच्या मोठ्या रस्त्यावर सभा पार पडली यावेळी सभेतील शेतकरी शेतमजूरांसह मंचावरील
मान्यवरांनी हात वदर करुन संघटनेची शपथ घेतली. तहसीलदार वरणगावकर यांनी भर पावसात येऊन शेतकरी शेतमजुरांच्या मागण्यांचा सविस्तर प्रस्ताव वरीष्ठ यंत्रणेला पाठवुन दखल मोर्चाच्या मंचावरून मागण्यांचे निवेदन स्वीकारले.न भुतो न भविष्यती अशा पार पडलेल्या आजच्या मोर्चात महिलांची उपस्थिती उल्लेखनीय ठरली.
Share your comments