जलसंधारण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांनी पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Saturday, 22 December 2018 10:20 AM


मुंबई:
केंद्रीय जलसंसाधन, नदी विकास व गंगा संरक्षण मंत्रालयाच्यावतीने जलसंधारण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या राज्य, जिल्हा, जिल्हा परिषद/नगरपालिका/पंचायत समिती, गाव/ग्रामपंचायत, शाळा याबरोबरच जलसंधारणाची व्यापक जनजागृती करणाऱ्या वर्तमानपत्रे व दूरचित्रवाणी वाहिन्यांसाठी पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्कारासाठी मंत्रालयाने 31 डिसेंबर 2018 पर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जलसंधारणासंदर्भात देशात मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. यातील उत्कृष्ट कामांना तसेच ती कामे करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट राज्य, जिल्हा परिषद, नगर पंचायती, ग्रामपंचायती, शाळा आदींना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तसेच जलसंधारणाच्या कामांना व्यापक प्रसिद्धी देऊन या कामात हातभार लावणाऱ्या विविध वर्तमानपत्रांना तसेच दूरचित्रवाणी वाहिन्यांनासुद्धा यामध्ये पुरस्कार देण्यात येणार आहेत. मार्च 2019 मध्ये या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. यासंबंधिची अधिक माहिती www.mowr.gov.in  www.cgwb.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

नदी विकास व गंगा संरक्षण ganga river ganga protection गंगा संरक्षण

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.