सागरी मत्स्यव्यवसाय नौकानयन प्रशिक्षणासाठी 24 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Monday, 17 December 2018 12:51 PM


मुंबई:
‘सागरी मत्स्यव्यवसाय नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचलन’ हा 6 महिन्यांचा प्रशिक्षण वर्ग वर्सोवा येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र येथे 1 जानेवारी 2019 पासून सुरू होत आहे. या प्रशिक्षणाला प्रवेशासाठी 24 डिसेंबर 2018 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन वर्सोवा मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकाऱ्यांनी केले आहे.

मत्स्यव्यवसाय विकास व विस्तार होण्याच्या दृष्टिकोनातून मत्स्यव्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थींना हे 6 महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येते. सन 2018-19 या वर्षातील 121 वा प्रशिक्षण वर्ग 1 जानेवारी ते 30 जून 2019 या 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. प्रती प्रशिक्षणार्थी दरमहा 450 रुपये तर दारिद्र्य रेषेखालील प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा 100 रुपये शुल्क राहील.

प्रशिक्षण कार्यक्रमासाठी पात्र प्रशिक्षणार्थींसाठी निकष:

  • प्रशिक्षणार्थी क्रियाशील मच्छिमार व प्रकृतीने सुदृढ असावा.
  • वय 18 ते 35 वर्षे या मर्यादेत.
  • पोहता येणे आवश्यक.
  • किमान इ. 4 थी उतीर्ण.
  • मासेमारीचा किमान 2 वर्षाचा अनुभव असावा.
  • प्रशिक्षणार्थी बायोमेट्रिक कार्डधारक किंवा आधार कार्डधारक असावा.
  • विहित परिपूर्ण अर्ज व त्यावर संबंधित संस्थेची शिफारस असणे आवश्यक आहे.
  • प्रशिक्षणार्थी दारिद्र्य रेषेखालील असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र.
  • संबंधित गट विकास अधिकारी यांच्या दाखल्याची साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडुरंग रामले मार्ग, तेरे गल्लीवर्सोवा, अंधेरी (पश्चिम), मुंबई- 61 येथे संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Marine Fisheries Navigation सागरी मत्स्यव्यवसाय नौकानयन वर्सोवा Versova

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.