महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अनुदान (Subsidy) मिळणार आहे. 2019-20-21 या तीन वर्षातील किमान 2 वर्षे आपल्या पीक कर्जाची (Crop Loan) परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे.
50 हजारांच्या प्रोत्साहन अनुदानाची दुसरी यादी जाहीर
50 हजारांच्या प्रोत्साहन अनुदानाची (Subsidy) दुसरी यादी ऑनलाईन प्रकाशित करण्यात आली आहे. मात्र, यामध्ये अनेकांना यावर यादी दिसणार नाही. ज्याचं कारण म्हणजे कोल्हापूर, सातारा, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांच्या याद्या प्रकाशित करण्यात आल्या आहे.
त्याचप्रमाणे हळू हळू इतर जिल्ह्यांच्या (Lifestyle) याद्या देखील या csc पोर्टलवर प्रकाशित होत आहे. मात्र काही जिल्ह्यांच्या याद्या प्रकाशित झाल्या नाहीत त्या शेतकऱ्यांना (Department of Agriculture) अद्याप दिसणार नाहीत. यासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागेल.
हेही वाचा: खुशखबर! आता मागेल त्याला मिळणार विहीर; विहीरीच्या अनुदानात वाढ आणि अट रद्द
कशी पाहायची ऑनलाईन लाभार्थी यादी?
१. csc च्या पोर्टलवर त्याच शेतकऱ्यांना याद्या पाहता येतील ज्या शेतकऱ्यांचे csc पोर्टलवर अधिकृतता (Authorization) असेल.
२. तुम्हाला csc पोर्टलवर कर्ज सर्च करावं लागेल.
३. तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची लिंक दिली जाईल. यावर क्लिक करावे लागेल.
४. यानंतर तुम्ही त्या पोर्टलवर जाल. त्यावर तुम्हाला लिस्ट हा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करावे.
५. यानंतर तुम्हाला तेथे जिल्ह्याचे नाव टाकावे लागेल.
६. तालुका निवडल्यानंतर तुम्हाला गावांची नावे दिसतील.
७. तुम्ही ज्या गावातील असाल त्या गावाची लाभार्थी यादी तुम्ही पाहू शकता.
८. त्यांनतर A पासून Z पर्यंत तालुक्यांची नावे दिली जातील.
९. यानंतर तुम्हाला केवायसी साठी सूचना करण्यात येतील.
१०. जर यावर तुमची माहिती चुकीची असल्यास बँकेत आक्षेप नोंदवावा.
हेही वाचा: आज ‘या’ चार जिल्ह्यात कोसळणार अवकाळी पाऊस; पंजाबराव डख यांचा अंदाज
शेतकऱ्यांना 50 हजारांच्या प्रोत्साहन अनुदानासाठी kyc प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. आता या दुसऱ्या यादीत तुमचं नाव आल्यानंतर तात्काळ kyc प्रक्रिया करून घ्यावी. तरचं शेतकऱ्यांना 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान मिळू शकते.
हेही वाचा: आजचे राशीभविष्य: 'या' राशींच्या लोकांनी विचारपूर्वक निर्णय घ्या, यश हमखास मिळेल!
Share your comments