1. बातम्या

पशुआहार महागाई आणि पाणीटंचाईमुळे पशुधनाच्या विक्रीत वाढ

राज्यात उन्हाचा जोर वाढत चालला असून, अनेक भागात वाढत्या उन्हाबरोबर पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. तसेच चाऱ्याचे भाव वाढल्याने शेतकरी पशुधन विकताना दिसत आहेत.

Animal husbandry in crisis due to rising fodder prices; Inflation and water scarcity have led to an increase in livestock sales

Animal husbandry in crisis due to rising fodder prices; Inflation and water scarcity have led to an increase in livestock sales

राज्यात उन्हाचा जोर वाढत चालला असून, अनेक भागात वाढत्या उन्हाबरोबर पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. तसेच चाऱ्याचे भाव वाढल्याने चारा खरेदी करणेही शेतकऱ्यांना परवडत नाही,  पशुपालन परवडत नसल्याने आपल्या पोटच्या गोळ्याप्रमाणे संभाळलेले जनावरे आता कवडीमोल भावात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्याचे चित्र राज्यातील अनेक बघायला मिळत आहे.

पशु पालक शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत, पण या योजनांची अंमलबजावणी होत नाही. ग्रामीण भागात सातत्याने पाणीटंचाई निर्माण होते विशेषकरून उन्हाळ्यात खूप मोठी समस्या असते. पशुखाद्याचे आणि चाऱ्याचे वाढलेले भाव हे शेतकऱ्यांना परवडत नाही त्यामुळे आपल्या गोठ्यातील जनावरे विकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

राज्यातील सर्वच दुष्काळी भागात, व जिरायत भागात कमी अधिक प्रमाणात अशीच स्थिती आहे. त्यामूळे ग्रामीण भागात एकेकाळी मोठ्या संख्येने दिसणारे पाळीव प्राण्यांचे गोठे आता दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहेत.

सध्या महागाई आणि चारा टंचाईमुळे काळजावर दगड ठेवून जिवापाड जपलेल्या गाई-गुरे-म्हशींची विक्री करण्याची वेळ राज्यातील पशुपालकांवर आली आहे. यामध्ये अहमदनगर जिल्हातील घोडेगाव येथील भरणाऱ्या जनावरांच्या बाजारात विक्रीचे प्रमाण वाढले आहे. विक्री वाढल्यामुळे भाव कमी झाले आहेत.

ग्रामीण भागात कायमच पाण्याची समस्या असते, पावसाळ्यात काही प्रमाणात चारा मिळतो पण जानेवारीपासून हा चारा कमी होऊ लागतो, शेतात चारा असतो पण पाण्याअभावी तो या दिवसात राहत नाही. यासाठी ग्रामीण भागात पाणी पोहचवणे गरजचे असून जलसंधारण कामे वाढवणे गरजेचे आहे. पशुपालक शेतकऱ्यांचा हा शेतीला जोडधंदा असतो. पण हा जोड धंदा जर बंद झाला तर  शेतकऱ्यांवर संकट येऊ शकते.

महत्वाच्या बातम्या
कदाचितच माहित असतील या मिरचीच्या जाती! परंतु जर लागवड केली तर मिळते बक्कळ उत्पादन
हलक्यात घेऊ नका! जमिनीतील उपयुक्त सूक्ष्म जिवाणूच तारतील शेतीला, म्हणून वाढवा मातीमधील सेंद्रिय कर्ब

English Summary: Animal husbandry in crisis due to rising fodder prices; Inflation and water scarcity have led to an increase in livestock sales Published on: 27 April 2022, 12:21 IST

Like this article?

Hey! I am शैलेश म्हातारदेव डमाळे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters