1. कृषीपीडिया

कदाचितच माहित असतील या मिरचीच्या जाती! परंतु जर लागवड केली तर मिळते बक्कळ उत्पादन

आपल्याला माहित आहेच की रोजच्या आहारामध्ये मिरची आवश्यक आहे. जर आपण हिरव्या मिरचीचा विचार केला तर बाजारांमध्ये वर्षभर मागणी चांगली असते. तसेच विदेशातून देखील भारतीय मिरचीला चांगल्याप्रकारे मागणी आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक

आपल्याला माहित आहेच की रोजच्या आहारामध्ये मिरची आवश्यक आहे. जर आपण हिरव्या मिरचीचा विचार केला तर बाजारांमध्ये वर्षभर मागणी चांगली असते. तसेच विदेशातून देखील भारतीय मिरचीला चांगल्याप्रकारे मागणी आहे.

महाराष्ट्र मध्ये एकूण मिरची लागवडी खालील 68 टक्के क्षेत्र हे जळगाव, धुळे, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात जास्त करून आहे. मिरचीचा तिखटपणा या गुणधर्मामुळे महत्त्वाचे मसाल्याचे पीक आहे. तसेच मिरची मध्ये काही औषधी गुणधर्म देखील असतात. मिरची पिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न हातात मिळते. परंतु त्यासाठी मिरचीच्या योग्य जातींची लागवड करणे देखील महत्त्वाचे असते. जातींची लागवडीसाठी वापरण्यात येणाऱ्या जाती दर्जेदार असतील  तर मिळणारे उत्पादन देखील दर्जेदार आणि तेवढेच भरघोस मिळते. या लेखामध्ये आपण काही स्थानिक मिरचीच्या जातींची माहिती घेणार आहोत.

 मिरचीच्या काही स्थानिक जाती

1- दोंडाईचा - या जातीची मिरची ची झाडे उभी व जोमदार वाढतात. झाडांचा विस्तार इतर जातींपेक्षा मोठा असून मिरचीची फळे लांब व रुड वजनदार असतात. फळांची साल जाड असते व फळ देठाकडे रुंद व टोकाकडे किंचित निमुळते असते. फळांची लांबी आठ ते दहा सेंटिमीटर व रुंदी एक सेंटिमीटर असते.

या जातीस भावनगरी असे देखील म्हटले जाते. दोंडाईचा मिरची ही जात कमी तिखट असल्यामुळे भज्या तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरली जाते व त्यामुळे या मिरचीला खूप मागणी असते.

2- देगलूर- या जातीच्या मिरचीची फळे लांब व देठापासून एकाच जाडीची असून मध्यम तिखट असतात. महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात या जातीची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते.

3- पांढुरणी- या जातीची मिरची मध्यम लांबीची असून फळे रुंद व मध्यम तिखट असतात. बागायती उत्पादन चांगले मिळत असून विदर्भामध्ये लोकप्रिय जात आहे.

4- काश्मिरी मिरची- या प्रकारची मिरची अतिशय लाल गर्द, आकाराने बारीक व बोराच्या आकारासारखे असून कमी तिखट खाणाऱ्या भागात जास्त प्रमाणातवापर केला जातो. पश्चिम बंगाल मध्ये या मिरचीचा वापर करी मध्ये बुडवून काढून टाकण्यासाठी करतात. भज्यामध्ये वापरली जाणारी मिरची कमी तिखट, पोपटी रंगाची जाड सालीची राजस्थानी व दोंडाईचा मिरची असते. कलकत्ता सारख्या शहरांमध्ये लांब पिकाडोर सारखी परंतु पिकाडोर नसणारी वीतभर लांब, पोपटी, मऊ देठाची हिरवीगार असणारी व देठ जास्त दिवस टिकणारे मिरचीचा वापर होतो.

यामध्ये या जाती प्रचलित असून वैशाली जात आखूड, लवंगी, झाडावर उलट्या लागणारे अतितिखट व दिसायला आकर्षक असून ज्योतीपेक्षा अधिक तिखट जाणवतात. कष्टकरी काम करणारे लोकांमध्येही मिरची प्रचलित आहे.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरूच; धक्कदायक आकडेवारी आली समोर

नक्की वाचा:शेतकरी आहात सर्व माहिती असणे गरजेचे! काळी मिरी लागवडिविषयी माहिती

नक्की वाचा:इथे सेंद्रिय शेतीसाठी देशी गायींच्या संगोपनासाठी दिले जाणार दरमहा ९०० रुपये

English Summary: this local veriety of chilli crop is so profitable for farmer Published on: 27 April 2022, 10:28 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters