पोळा हा कृषी संस्कृतीमधील सर्वात मोठा व महत्त्वपूर्ण सोहळा आहे. शेतकरी आणि बैलांचे नाते कृषी संस्कृतीमध्ये अभेद्य आहे. प्रामाणिकपणे शेती हा व्यवसाय करतो. म्हणून बैलपोळा निमित्ताने बैलाचा सन्मान व बळीराजांचाही सन्मान व्हावा या उद्देशाने संजय देशमाने व त्यांच्या टीमने हा अभिनव उपक्रम देऊळगाव माळी तालुका मेहकर येथे राबवला.बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी गावांमधून गावातील बैलजोडीची वाजत गाजत मानसन्मानाने मिरवणूक काढून उत्कृष्ट बैल जोडीला बळीराजाच्या
सन्मानार्थ बक्षिसाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते.A prize was also organized in honor. तसेच उत्कृष्ट बैल जोडीला बक्षीस सुद्धा देण्यात आली. यामध्ये प्रथम बक्षीस श्याम त्रंबक बळी यांच्या बैल जोडीला मिळाले. तर द्वितीय गजानन तुळशीदास गाभणे, तृतीय गणेश बाबुराव गाभणे, चतुर्थ गणेश आत्माराम सुरुशे, पाचवे बक्षीस सुभाष हरिभाऊ चाळगे. यांच्या बैल जोडीला मिळाले. या व्यतिरिक्त उत्तेजनार्थ म्हणून उत्कृष्ट बैल जोडीला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. या सोहळ्यासाठी नारायण आत्माराम बळी, गणेश काशिनाथ मगर,
प्रकाश भाऊ फकीरा डोंगरे, भागवत श्रीरंग बळी, संजय मोरे सावंगी वीर, किशोर विश्वनाथ गाभणे, राजेश बळीराम मगर, स्वप्निल सुनील गाभणे, संजय एकनाथ देशमाने, या दात्यांनी दातृत्व भावनेतून या सोहळ्यासाठी बक्षीस दिली. यांच्यासह गावातील बैल जोडी प्रेमींनी सुद्धा उत्तेजनार्थ बक्षीस दिली. सोहळ्यासाठी जगन्नाथ आत्माराम बळी यांची अध्यक्ष म्हणून उपस्थिती लाभली. तर प्रमुख उपस्थिती म्हणून सरपंच किशोर गाभणे, नारायण बळी, प्रकाश डोंगरे, राजेश मगर,गणेश मगर, व आदी मान्यवर
मंडळींची उपस्थिती लाभली. तसेच या भव्य दिव्य अशा सन्मान बैल जोडीचा सत्कार बळीराजाचा या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ.ठाकरे पशुसंवर्धन विकास अधिकारी, डॉ.किरण लहाने मॅडम, डॉ.सुजित निकम,हे लाभले.तसेच हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी गावातील तरुण मंडळी गावकरी मंडळी यांनी मोलाचे सहकार्य केले. हा कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी मेहकर पोलीस
स्टेशन च्या पोलीस बांधवांचा बंदोबस्त होता.यावेळी पोलीस उपनिरीक्षक रवी मोरे, बीट जामदार,अशोक मस्के,रामेश्वर रिंढे,पोलीस पाटील गजानन चाळगे, यांच्यासह पोलिस बांधव उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कलोरे व संजय जाधव यांनी केले.हा भव्य दिव्य असा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील तरुण मंडळी व गावकरी मंडळी यांचे सहकार्य लाभले.
Share your comments