अम्फान वादळाचे झाले सुपर चक्रीवादळात रुपांतर; किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा

19 May 2020 04:47 PM By: KJ Maharashtra


अम्फान वादळाने अखेर आपलं विराट रुप घेत सुपर चक्रीवादळात रुपांतर केले आहे. पश्चिम बंगाल, ओडिशातील किनारपट्टी भागाला तडाखा बसण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज हे चक्रीवादळ तीव्र वेगाने पश्चिम बंगाल आणि बांगलदेशच्या किनारपट्टीभागात धडकेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दक्षिण बंगालच्या खाडीत पश्चिम-मध्य, आजूबाजूच्या मध्य क्षेत्रावरुन जवळपास  ११ किलोमीटर ताशी वेगाने हे वादळ उत्तरेच्या दिशेने येत आहे.  सुपर चक्रीवादळामुले काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

दरम्यान राज्याच्या किनारपट्टी भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम राष्ट्रीय आपत्ती निवारण  दलाकडून  (एनडीआरएफ केले जात आहे. सुपर चक्रीवादळामुळे १८ ते १९ मे पर्यंत २३० रस २४० किलोमीटर ताशी वेगाने तर २० मेला १८० ते १९० किलोमीटर ताशी वेगाने वाऱे वाहतील.  २१ मे पर्यंत दबाब कमी होऊन वादळाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे.  दरम्यान या वादळामुळे काही राज्यात पाऊस पडणार आहे. ओडिशाच्या किनारपट्टी भागात १८ मे पासून सौम्य तसेच मध्यम पावसाची शक्यता आहे. ओडिशातील गजपती, गंजम, पुरी, जगतसिंहपूर तसेच केंद्र पाडा जिल्ह्यातही पाऊस होऊ शकतो. जाजपूर, बालासोर, भद्रक, मयूरभंज भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. 

दक्षिण बंगालच्या खाडीतील पश्चिम-मध्य तसेच निकटवर्तीय मध्य भागात, तसेच मध्य बंगालच्या खाडीसह उत्तर बंगालच्या खाडीत मासेमारीसाठी न जाण्याचा इशारा मच्छिमारांना देण्यात आला आहे.  उत्तर - उत्तर पूर्व दिशेने येणाऱ्या या चक्रीवादळ उत्तर पश्चिम बंगालच्या खाडीसह पश्चिम बंगाल- बांगलादेशाच्या किनारपट्टी भागातील दीघा, पश्चिम बंगाल तसेच हटिया बेटसमूह, बांगलादेश दरम्यान सुंदरबन नजीक २० मे ला दुपारी हे वादळ धडकण्याची शक्यता आहे. सुपर चक्रीवादळामुले किनारपट्टी भागात १६५ ते १७५ किलोमीटर ताशी वेगाने धडकेल.  वाऱ्याचा वेग किमान १९५ किलोमीटर ताशी वेगाने राहील.

amphan cyclone wheather IMD IMD forecast weather department amphan cyclone turned into a super cyclone अम्फान वादळाचे झाले super cyclone मध्ये रुपांतर amphan चक्रीवादळ
English Summary: amphan cyclone turned into a super cyclone alert to costal areas

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.