माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना सहकारात मोठा अनुभव आहे. अनेक वर्षे त्यांनी यामध्ये काम केले असून अनेक सहकारी संस्था चालवण्यात आणि उभा करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. असे असताना सहकार मंत्रालयाच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने मंगळवारी शरद पवार यांची नवी दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीची माहिती शरद पवार यांनी स्वत: त्यांच्या फेसबुक पेजवरून दिली आहे.
सहकार क्षेत्रातील अनुभव सांगण्याची आणि सहकार मंत्रालयाचे कामकाज प्रभावीपणे चालण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्याची विनंती मंत्रालयाच्या शिष्टमंडळाने शरद पवार यांना यावेळी केली. यामुळे आता देशाचे सहकारविषयक धोरण आणि निर्णय घेण्यासंदर्भात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या सहकार मंत्रालयास मार्गदर्शन करणार आहेत.
यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा नक्कीच होणार आहे. सहकार मंत्रालयाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन शरद पवार यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले आहे. हे मंत्रालय नवीनच स्थापन करण्यात आले आहे. अमित शहा हे या खात्याचे मंत्री आहेत. या भेटीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली आहे.
या शिष्टमंडळात ज्ञानेशकुमार, सहसचिव पंकज कुमार बन्सल, उपसंचालक श्रीमती सुचेता, मुख्य संचालक ललित गोयल यांचा समावेश होता. सरकार हा अनेकांच्या जीवनाशी संबंधीत विषय आहे. अनेक शेतकरी आणि कष्टकरी लोक यावर अवलंबून आहेत. गेल्या काही दिवसांपासून सहकार मोडीत निघण्याची भीती देखील व्यक्त केली जात होती.
महत्वाच्या बातम्या;
पावसाचा जोर ओसरला, आता नुकसानाच्या पंचनाम्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना निधी वितरीत, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
मोठी बातमी! ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाले, निवडणुका घेण्याचे कोर्टाचे आदेश
Share your comments