सध्या भारतीय बाजारपेठेत अमेरिकेच्या पॅसिफिक नोर्थवेस्ट भागातून येणाऱ्या मोठ्या आकाराच्या गडद लाल रंगाचे चेरीजचे भारतीय बाजारपेठेत आगमन झाले आहे.
हे फळ भारतीय ग्राहकांसमोर सादर करण्यासाठी अमेरिकेच्या स्टेट ऑफ वॉशिंग्टन येथे स्थित नॉर्थ वेस्ट चेरी ग्रोवर्स ने पहिली प्रसिद्ध मोहीम सुरू केली आहे.
भारतीय बाजारपेठेत दाखल झालेल्या या चेरीजचे झालेले आगमन साजरे करण्यासाठी अमेरिकी दुतावासाच्या कृषी विभागाचे मिनिस्टर कौन्सेलर रॉन व्हरडॉक यांनी चाणक्यपुरी येथील फूड हॉल मध्ये एक प्रोत्साहन मोहिमेचे उद्घाटन केले.
अमेरिकच्या नॉर्थ वेस्ट येथून आलेल्या चेरिज ची नजरेत भरणारी मांडणी किरकोळ विक्रेत्यांनी केली असून त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे प्रोत्साहनही मिळत आहे. याप्रसंगी बोलतांना व्हरडोक म्हणाले की, अमेरिका हा गोड अशा चेरीजचा जगातील सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातदार देश आहे. अमेरिकेमध्ये या चेरीज ची लागवड प्रामुख्याने वॉशिंग्टन, ओरेगोन ईदाहो, उटाह आणि मोन्ताना या राज्यामध्ये केली जाते. या उत्पादित चेरिचा आकार हा मोठा आणि दर्जा उत्तम दर्जा तसेच आकाराने मोठी असल्याने जगभरातील ग्राहकांमध्ये तिला पसंती मिळत आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, भारतामध्ये झालेल्या चेरीच्या आगमनामुळे मला आनंद होत आहे. खाद्यपदार्थ हा भारत आणि अमेरिका या मधील व्यापाराचा एक मोठा महत्वाचा भाग आहे आणि आमच्या पॅसिफिक नोर्थ्वेस्त भागातून आलेल्या चेरी मुळे या व्यापारिक देवाण-घेवानी मध्ये एक चविष्ट भर पडली आहे याचा मला आनंद आहे असे ते म्हणाले.
Share your comments