केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सतत चर्चेत असणारे नेते आहेत. अनेकदा ते कामांवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरतात. त्यांच्याकडे रोड निर्मितीचे खाते असल्याने त्यांना रोडकरी देखील म्हणतात. असे असताना आता नुकतेच त्यांनी एका कार्यक्रमामध्ये अधिकाऱ्यांना सर्वांसमोर झापले आहे. यामुळे याची चर्चा सुरु आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते.
ते म्हणाले, अधिकाऱ्यांनी फक्त येस सर म्हणायचे आणि आम्ही म्हणतो त्याची अंमलबजावणी करायची. 'मी नेहमी अधिकाऱ्यांना सांगतो की तुम्ही म्हणाल तसे सरकार चालणार नाही. तुम्ही फक्त 'येस सर' म्हणायचे आणि आम्ही म्हणतो त्याची अंमलबजावणी करायची हे लक्षात ठेवा, आम्ही म्हणू तसे सरकार चालेल, असेही गडकरी म्हणाले.
महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सच्या नागपूर शाखेने आदिवासींच्या आरोग्यासाठी ब्लॉसम हा प्रकल्प सुरू केला. याचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले. तसेच ते म्हणाले, मी महाराष्ट्रात 1995 मध्ये मंत्री होतो. त्यावेळी मी मुंबईत अनेक रस्ते, पूल बांधले, पण गडचिरोली आणि मेळघाटमध्ये तसे करताना अडचणी आल्या. या भागात कुपोषणामुळे दोन हजार मुलांचा मृत्यू झाला.
कोण आहेत बिहारचे न होऊ शकलेले एकनाथ शिंदे? नितीशकुमारांनी उद्धव ठाकरे होण्याआधीच ओळखली गेम, आणि...
याठिकाणी 450 गावांना रस्ते नव्हते. खूप प्रयत्न केले, आयुक्तांनी सांगितले, मात्र वनविभागाचे अधिकारी रस्तेच बांधू देत नव्हते. त्यामुळे खूप त्रास झाला. या भागात अनेक लोक मागासलेली होती. त्यामुळे वनविभागाने त्रास देऊनही मी माझ्या मार्गाने नंतर प्रश्न सोडवला, असे गडकरी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो आता पीव्हीसी पाईपसाठी मिळणार ३० हजार रुपये, असा घ्या लाभ..
प्रतीक्षा संपली! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार लवकरच होणार लॉन्च, जाणून घ्या खासियत..
डोनाल्ड ट्रम्प यांच्या घरी FBI चा छापा, इतिहासात पहिल्यांदाच कारवाई केल्याने जगभरात खळबळ
Share your comments