उपमुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारताच अजित पवार यांनी आता कामांना सुरुवात केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिंदे-फडणवीस-पवार यांच्या सरकारची मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत ग्रीन हायड्रोजन धोरणाला मंजुरी देण्यात आली.
या बैठकीत ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करण्यात आले. तसेच दिंडोरी येथील कळमुस्ते प्रवाही वळण योजनांना मान्यता देण्यात आली. ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले. या बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री मंत्रालयात आले.
या बैठकीत मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी सयाजीराव गायकवाड - सारथी शिष्यवृत्ती योजना. 75 विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती, दिंडोरी तालुक्यातील चिमणपाडा आणि त्र्यंबक तालुक्यातील कळमुस्ते येथील प्रवाही वळण योजनांना मान्यता.
आता फक्त कालवडच जन्माला येणार! या सरकारने घेतला मोठा निर्णय..
तसेच सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती, न्यायमूर्ती किंवा त्यांचे पती, पत्नी यांना सेवानिवृत्तीनंतरचे लाभ
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली, गेळे आणि चौकुळ येथील कबूलायतदार गावकर जमिनीबाबत निर्णय.
नागपूर कृषि महाविद्यालय येथे आंतरराष्ट्रीय कृषि सुविधा केंद्र. मत्स्यबीज उत्पादन आणि मत्स्यबीज संवर्धन केंद्रांचा भाडेपट्टी कालावधी वाढवून आता 25 वर्षे.
एका अंड्याची कमीत चक्क १०० रुपये, जाणून घ्या काय आहे खासियत..
या बैठकीआधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन मंत्रालयात प्रवेश केला. अजित पवार यांच्या शपथविधीनंतर महाविकास आघाडीमध्ये निधी वाटपावरून आरोप करणारे शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडीला मांडी लावून बसले होते.
आम्ही साहेबांच्या सोबत!! बैलाच्या अंगावर लिहीत सांगलीतल्या वाळवामधील शेतकऱ्याचं पवार प्रेम दाखवलं..
आज जागतिक फणस दिवस, जाणून घ्या फणसाचे आरोग्यासाठीच फायदे
टोमॅटोने केला कहर! दिल्लीत टोमॅटो 160 रुपये किलो....
Share your comments