MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

Ajit Pawar: अजित पवार मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना भेटणार! राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची करणार मागणी

Ajit Pawar: राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या परतीच्या पावसाने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संततधार पावसामुळे हातातोंडाला आलेली पिके वाया गेल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेऊन ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करणार आहेत.

ऋषिकेश महादेव वाघ
ऋषिकेश महादेव वाघ
Ajit pawar

Ajit pawar

Ajit Pawar: राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या परतीच्या पावसाने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संततधार पावसामुळे हातातोंडाला आलेली पिके वाया गेल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेऊन ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करणार आहेत. 

राज्यातील शेतकर ऐन दिवाळीच्या तोंडावर अतिवृष्टीमुळे शेतकरी (Farmers) संकटात सापडला आहे. पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यातच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी आणि ओला दुष्काळ (wet drought) जाहीर करावा यासाठी अजित पवार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

खरीप पिके (Kharip Crop) काढणीला आलेली असताना आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. मात्र सलग आठ दिवस राज्यात पावसाने मुक्काम ठोकल्याने काढणीला आलेली सोयाबीन, कापूस, मका आणि इतर पिके पाण्याखाली गेली आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

दिवाळीच्या तोंडावर काढणीला आलेली पिके पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तसेच नुकसान भरपाई दिवाळी अगोदर मिळाली नाही तर दिवाळी कशी साजरी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांकडून सरकारला विचारला जात आहे.

Nano Urea: नॅनो युरियाचा शेतकऱ्यांना किती फायदा? थेट पंतप्रधान मोदींनीच सांगितलं

मराठवाडा आणि विदर्भात पावसाने सर्वाधिक धुमाकूळ घातला आहे. मान्सूनचा अगोदर कोसळलेला पाऊस आणि पुन्हा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे. त्यामुळे अजित पवार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करणार आहेत.

अजित पवार यांनी पुण्यात साचलेल्या पाण्यावरून भाजपवर टीका केली आहे. पुण्यात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) परिणाम वाहतुकीवर झाला. तसेच अनेक भागात पाणी साचले तर काही भागात पाणीउ शिरल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. 

सोने खरेदीदारांसाठी दिवाळीत सुवर्णसंधी! सोने 5800 तर चांदी 24000 रुपयांनी स्वस्त...

पुणे महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे. त्यावरून अजित पवार यांनी टीका एली आहे. अजित पवार म्हणाले, स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवून भाजपनं पुणे शहराचं पार वाटोळं करुन ठेवलं आहे. भाजपशासित पुणे मनपानं पुण्यात काय दिवे लावलेत याची कल्पना येत असल्याचेही अजित पवार म्हणाले.

लोकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. मनपाला 'अव्यवस्थेची' कारणं काय आहेत ती सांगावीच लागतील. तूर्तास पुण्यातील जनतेला आवश्यक ती सर्व मदत करणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही पाठपुरावा करतंच आहोत. जनतेने देखील आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन पवार यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या:
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ! महाराष्ट्रासह अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा
वाहनधारकांसाठी मोठी बातमी! कच्च्या तेलाच्या दरात घसरण, पहा आजचे पेट्रोल डिझेलचे भाव...

English Summary: Ajit Pawar will meet the Chief Minister along with the Deputy Chief Minister! Demand to declare wet drought in the state Published on: 19 October 2022, 12:42 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश महादेव वाघ. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters