गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील विमानतळाबाबत अनेकदा जागा बदलण्यात येत आहेत. यामुळे याबाबत संभ्रम निर्माण होत आहे. आता पुण्यासाठीच्या पुरंदर विमानतळाच्या जागेत बदल करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने बदलला आहे. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या पुरंदर तालुक्यातील मूळ जागेवरच विमानतळ उभारण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
यामुळे आता त्याच ठिकाणी विमानतळ होणार आहे. याबाबत केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने पुरंदर-बारामती तालुक्यातील नव्या जागेला नकार दिल्याने आता पुरंदर तालुक्यातच विमानतळ होणार असून त्याबाबत पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. अनेक वर्षांपासून हा प्रश्न तसाच रखडला आहे. यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे आता पुरंदर विमानतळाचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. याबाबत झालेल्या बैठकीत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित श्री छत्रपती संभाजी महाराज विमानतळाबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी तालुक्यातील पूर्वीच्याच निश्चित केलेल्या जागेलाच सरकारने हिरवा कंदिला दिला आहे. यामुळे आता कामाला वेग आला आहे.
आताची मोठी बातमी! पुण्यात दारू बंदी, जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश..
यासाठी २८३२ हेक्टर क्षेत्राचा विशेष डीपीआर आहे. त्यापैकी दोन हजार हेक्टर क्षेत्राची प्रत्यक्षात संपादनाची गरज आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहे. यासाठी दिवसेंसदिवस किमती वाढत आहेत. २०१८ मध्ये संपादनासाठी ३७०० कोटींची गरज होती. मात्र आता ही रक्कम वाढणार आहे. आता यासाठी चार हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम लागण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या;
LED bulb; वीज गेल्यावर ४ तास लाइटिंग बॅकअप देतो 'हा' LED ब्लब, किंमत फक्त..
कारखाने कसे विकत घेतले? आयकरची धाड पडलेल्या अभिजित पाटलांनी केला मोठा खुलासा
गोकुळ दूध संघाची सभा ठरली वादळी! सतेज पाटील, हसन मुश्रीफांना भिडल्या शौमिका महाडिक..
Share your comments