देशभरात लम्पीने थैमान घातले आहे. लम्पीचा महाराष्ट्रादेखील मोठ्या प्रमाणात प्रभाव जाणवला. लम्पी आजारामुळे शेतकऱ्यांचं (Farmers) मोठं नुकसान झालंय. एकीकडे जनावरं आजारी पडून दगावत आहेत. तर दुसरीकडे त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर जनावरं दगावल्याने आर्थिक संकटात सापडला आहे.
बुधवारी (12 ऑक्टोबर, 2022) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत लम्पी आजाराबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. लम्पी आजारामुळे दगावलेल्या जनावरांच्या मालकाला आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे.
हा साखर कारखाना उभारणार इथेनॉल प्लांट; शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
कुणाला किती अर्थसहाय्य?
दुधाळ गायीचा मृत्यू झालेला असल्यास मालकाला 30 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. लम्पी आजारामुळे बैलाचा मृत्यू झाल्यास 25 हजार रुपयांचं आर्थिक साहाय्य करण्यात येणार आहे. तर वासराचा मृत्यू झाल्या 16 हजार रुपयांची मदत संबंधित मालकाला मिळणार आहे.
इथेनॉलवर चालणारी पहिली कार भारतात लाँच; शेतकऱ्याचे नशीब चमकणार
शिंदे-फडणवीस सरकारकडून कडून मदतीचा शासन आदेश बुधवारी जारी करण्यात आलाय. 4 ऑगस्टपासून ज्यांची जनावरं लम्पी आजारामुळे मृत्युमुखी पडली आहेत, त्यांना सरकारकडून आर्थिक मदत करण्यात येणार आहे.
कीटकनाशकांच्या सुरक्षित आणि जबाबदार वापरासाठी ड्रोन फवारणी SOP तंत्रज्ञान
Share your comments