Pune News : राज्यात यंदा कमी अधिक स्वरुपाचा पाऊस झाला आहे. यामुळे अनेक धरणांतील पाण्यासाठी १०० पुर्ण झालेला नाही. तर सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात आतापर्यंत फक्त ३३ टक्केच पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी याच दिवशी उजनी धरण १०० टक्के क्षमतेने भरले होते.
उजनी धरणात ४ सप्टेंबर रोजी १७ टक्के पाणीसाठा होता तोच आज ३३ टक्के जलसाठा झाला आहे. दरम्यान, मागील वर्षी उजनी धरणात १०० टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे शेतकऱ्यांची आणि नागरिकांची चिंता मिटली होती. यंदा धरणात पाणी कमी असल्याने पाणीसाठ्याचे योग्य नियोजन जलसंपदा विभागाला करावे लागणार आहे.
सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे राज्यातील धरणांत ९ टक्के पाणीसाठा वाढला आहे. आज ३० सप्टेंबरपर्यंत राज्यातील धरणक्षेत्रात ७४ टक्के पाणीसाठा झाला आहे. ४ सप्टेंबर रोजी राज्यातील धरणक्षेत्रात ६५ टक्के पाणीसाठा होता.
उजनी धरण ३ जिल्ह्यांना वरदान
पुणे, सोलापूर आणि अमहदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उजनी धरण वरदान ठरले आहे. या उजनी धरणामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणी मिळते. मात्र यंदा धरणातच पाणीसाठा कमी असल्याने शेतकऱ्यांना पाणी संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यात कमी अधिक स्वरुपात पाऊस झाल्याने अनेक धरणांत कमी पाणीसाठा आहे. मात्र ज्या भागात अधिक पाऊस झाला तेथील धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. गेल्या चार-पाच दिवसांपासून नाशिकसह जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे, नाशिक जिल्ह्यातील सर्वच महत्वाची धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत.
Share your comments