1. बातम्या

संकटात सापडलेल्या वाहन उद्योगाला शेतीचा आधार

पुणे : देशव्यापी टाळेबंदीमुळे अडचणीत सापडलेल्या वाहन उद्योगाला कृषी क्षेत्राने तारले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत जूनमध्ये ट्रॅक्टर विक्रीमध्ये १०.८६ % ची वाढ नोंदवण्यात आली आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स अससोसिएशनच्या अहवालातून ही गोष्ट पुढे आली आहे.

KJ Staff
KJ Staff


पुणे : देशव्यापी टाळेबंदीमुळे अडचणीत सापडलेल्या वाहन उद्योगाला कृषी क्षेत्राने तारले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत जूनमध्ये ट्रॅक्टर विक्रीमध्ये १०.८६ % ची  वाढ नोंदवण्यात आली आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स अससोसिएशनच्या अहवालातून ही गोष्ट पुढे आली आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटलं होत की, कृषी क्षेत्रचं या कोरोना संकटातून देशाला तारेल. कृषी क्षेत्रावर आता आपल्या देशाचा जीडीपी ठरणार असून अर्थव्यवस्थेत सुधरणेसाठीही कृषी क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. याची प्रचिती आपल्याला वाहन उद्योगाच्या विक्रीतून दिसून येत आहे.  

यावर्षी वेळेत आलेला मान्सून, तसेच टाळेबंदीच्या काळात शेतकऱ्यांनी शहरांना पुरवलेल्या कृषिमाल तसेच राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध कर्ज योजनांमुळे ग्रामीण भागात गतवर्षीच्या तुलनेत ट्रॅक्टरची संख्या वाढली आहे. या संघटनेच्या अहवालानुसार यावर्षी जून महिन्यात गेल्या  वर्षीच्या  तुलनेत ४२% वाढ नोंदवण्यात आली आहे.  सर्वच प्रकारामध्ये ही वाढ नोंदवण्यात आली आहे. मागच्या वर्षी याचा काळात १६ लाख ९७ हजार वाहनांची विक्री झाली होती. तर यावर्षी फक्त ९ लाख ८४ हजार वाहनांची विक्री झाली आहे.

ग्रामीण भागातील जीवन पूर्वपदावर येत आहेत. शेती अवजारातील अग्रगण्य असणाऱ्या महिंद्रा आणि महिंद्रा या कंपनीने गेल्या वर्षीच्या तुलनेत १२% वाढ नोंदवली आहे. मागच्या वर्षी कंपनीने जूनमध्ये ३१ हजार ८०० ट्रॅक्टरची विक्री केली होती तर यावर्षी ३५ हजार ८०० ट्रॅक्टरची विक्री केली.

English Summary: agriculture sectors support to automobile sector Published on: 23 July 2020, 09:14 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters