1. बातम्या

देशातील वैज्ञानिकांनी शोधली बाजरीला लागणारा नवीन रोग; अमेरिकीने पण दिली मान्यता

भारत प्रमुख बाजरी उत्पादक देशांपैकी एक आहे. भारतात बाजरीचे भल्या मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते आणि शेतकरी बाजरी लागवडीतून चांगली कमाई करतात. भारतात जेवढे बाजरी उत्पादन होते तेवढीच बाजरीची मागणी देखील आहे. त्यामुळे बाजरी लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते. प्रत्येक पिकाच्या उत्पादनात परिणाम करणारा घटक म्हणजे त्या पिकावर येणारा रोग, रोगामुळे पिकाचे उत्पादन घटते, पण रोगावर असलेल्या औषधमुळे त्या रोगाच्या विपरीत परिणामपासून वाचता येते. बाजरी पिकात देखील आता असाच एक नवीन रोग जगासमोर आला आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
millet crop

millet crop

भारत प्रमुख बाजरी उत्पादक देशांपैकी एक आहे. भारतात बाजरीचे भल्या मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते आणि शेतकरी बाजरी लागवडीतून चांगली कमाई करतात. भारतात जेवढे बाजरी उत्पादन होते तेवढीच बाजरीची मागणी देखील आहे. त्यामुळे बाजरी लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते. प्रत्येक पिकाच्या उत्पादनात परिणाम करणारा घटक म्हणजे त्या पिकावर येणारा रोग, रोगामुळे पिकाचे उत्पादन घटते, पण रोगावर असलेल्या औषधमुळे त्या रोगाच्या विपरीत परिणामपासून वाचता येते. बाजरी पिकात देखील आता असाच एक नवीन रोग जगासमोर आला आहे.

भारतातील सर्वात मोठे बाजरी उत्पादक राज्य म्हणजे हरियाणा आणि ह्याच हरियाणातील एका कृषी विद्यापीठाणे बाजरीच्या नवीन रोगाचा शोध लावला आहे. चौधरी चरण सिंह कृषी विद्यापीठ, हिसार, हरियाणा ह्या विद्यापीठाणे हा शोध लावला आहे. बाजरीच्या ह्या ह्या नवीन रोगाचे नाव स्टेम रोट असे आहे व हा रोग क्लेबसिएला एरोजेन्स ह्या जिवाणूमुळे होतो. आता पर्यंत बाजरीच्या ह्या रोगाचा शोध लागला नव्हता, ह्या रोगाचा पहिल्यांदाचा शोध लावला गेला आहे. शास्त्रज्ञांनी या रोगावर औषध निर्मितीसाठी तसेंच प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना ह्यांचा शोध लावण्याचे काम सुरू केले आहे आणि ते शक्य तितक्या लवकर अनुवांशिक स्तरावर शोधण्याचा प्रयत्न करतील. शास्त्रज्ञांना आशा आहे की ते लवकरच या रोगावर उपचार शोधण्यात यशस्वी होतील.

हरियाणा कृषी विद्यापीठचे शास्त्रज्ञ आहेत पहिले शोधकर्ता

अमेरिकन फायटोपॅथोलॉजिकल सोसायटी (एपीएस), यूएसए ही संस्था वनस्पतीमध्ये नवीन रोगाचा शोध लावते तसेच ओळखण्याचे कार्य करते. ह्या संस्थेने प्रतिष्ठित जर्नल प्लांट डिसीजमध्ये प्रकाशित केले गेलेल्या या नवीन रोगाचा शास्त्रज्ञांचा अहवाल जर्नलमधील पहिला संशोधन अहवाल म्हणून स्वीकारला.  अमेरिकन फायटोपॅथॉलॉजिकल सोसायटी ही वनस्पतींच्या रोगांच्या अभ्यासासाठी काम करत असलेली सर्वात जुनी आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक संस्था आहे. ही संस्था विशेषतः वनस्पतीचे रोग जागतिक पातळीवर प्रकाशित करते. हरियाणा कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ हा रोग शोधणारे जगातील पहिले शास्त्रज्ञ आहेत आणि हरियाणा विद्यापीठ हे पहिले वहिले विद्यापीठ ठरले आहे.  विद्यापीठच्या शास्त्रज्ञांनी बाजरीतील स्टेम रॉट रोगावर संशोधन अहवाल सादर केला, ज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता देऊन संस्थेने आपल्या जर्नलमध्ये प्रकाशनासाठी स्वीकारला आहे.

 हरियाणा कृषी विद्यापीठाच्या ह्या यशामुळे, बाजरीवर येणाऱ्या ह्या रोगावर लवकरच उपाययोजना शोधल्या जातील आणि त्यामुळे भारताचा तसेच जगातील अनेक बाजरी उत्पादक देशांना फायदा मिळणार आहे.

ह्यामुळे भारतातील प्रमुख बाजरी उत्पादक राज्य जसे की, हरियाणा, राजस्थान, महाराष्ट्र गुजरात, उत्तर प्रदेश इत्यादी राज्यांना खुप फायदा मिळणार आहे. वेळेवर ह्या रोगाबद्दल समजल्यामुळे वैज्ञानीकांना हयावर संशोधन करन सोपं जाईल आणि लवकर ह्या रोगावर उपचार देखील सापडेल. त्यामुळे बाजरी उत्पादक शेतकऱ्यासाठी ही आनंदाची बाब आहे असे सांगितले जात आहे, तसेच वैज्ञानिक देखील लवकर ह्या रोगावर उपचार सापडेल अशी आशा व्यक्त करत आहेत. हरियाणा जेथील कृषी विद्यापीठच्या वैज्ञानिकांनी ह्याचा शोध लावला ते हरियाणा राज्य बाजरी उत्पादनात भारतात चौथ्या स्थानी आहे.

English Summary: agriculture scientist find new disease in millet crop Published on: 15 October 2021, 06:24 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters