1. बातम्या

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत कृषीमंत्री यांची भारतीय किसान संघासोबत चर्चा

KJ Staff
KJ Staff


मुंबई:
शेतकऱ्यांच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी व त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी मंगळवारी मंत्रालयात भारतीय किसान संघासोबत बैठक घेतली.

यावेळी एचटीबीटी कपासी बियाणे बेकायदेशीर विक्री, पिकविमा अंमलबजावणी व भरपाई, कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणाचा दर्जा सुधारणे, कृषी महाविद्यालयाचे आयसीएआर नुसार मूल्यांकन करणे, शेतमालाचे विपणन, ग्राम गोदाम योजना राबविणे, दुष्काळ आढावा, पूरग्रस्त भागात पुन्हा लागवड व रब्बी पिक अनुदान योजना, ठिबक सिंचन अनुदान 90 टक्के वाढविणे, बियाणे पुरवठा धोरण व नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प याबाबत चर्चा करण्यात आली.

बैठकीस आयुक्त सुहास दिवसे, सहसंचालक गणेश पाटील, उपसचिव किरण पाटील, किसान समन्वयक दादा लाड, भारतीय किसान संघाचे अध्यक्ष बळीराम सोळंकी, विदर्भ प्रांत महामंत्री बाबुराव देशमुख, प्रांत मंत्री किशोर ब्राम्हनाथकर, प्रांताध्यक्ष राहुल शिंदे, प्रांत संघटन मंत्री चंदन पाटील, रमेश मंडाळे आदी उपस्थित होते.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters