डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला सलंगीत श्री शिवाजी कृषि महाविद्यालय, अमरावती नेहमीच विविध समाजपयोगी कार्य करण्यात अग्रेसर असते. अगदी करोना काळातसुद्धा हे कृषिदूत योध्यासारखे गरजू लोकांना अन्न शिजवून पुरवत होते. याचाच एकभाग म्हणून आपली सामाजिक बांधिलकी जपताना आठव्या सत्रातील राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थि व विद्यार्थिनी महाविद्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम आटोपल्या नंतर थेट स्थानिक श्री नाकोड़ा भैरव भवन सदाशांती बालगृह येथे
पोहचले व तेथील अनाथ मुलींसोबत शिवजयंती उत्सव साजरा केला. सर्वप्रथम शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण करण्यात आले व शिवगर्जना करण्यात आली. यानंतर याप्रसंगी या चिमुकल्यांसोबत कृषिदुतांनी संवाद साधून त्यांच्या मनात असलेली आई-वडिलांबद्दल उणीव जाणून घेण्याचा आणि त्यांच्या मनातील दु:ख थोड्यावेळासाठी का होईना दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या दिनचर्याबाबत व त्या शिकत असलेल्या
शाळांबाबत आस्थेने चौकशी केली. गोष्टी व गायनाची मैफील सुद्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये आश्रमातील मुलीनी आपल्या गोड आवाजात गीत सादर केले. महाविद्यालयातील अल्पोपहार म्हणून फळ व बिस्किटे वाटप करून या चिमुकल्या भगिनींचा निरोप घेतला. वरील कार्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकिशोर चिखले तसेच रासेयो अधिकारी डॉ. दीपक पाडेकर, डॉ. सुलभा सरप व प्राध्यापकाचे मार्गदर्शन लाभले.
श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती येथील विद्यार्थी समाजासाठी काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करीत असतात. या अगोदरही या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी महापुरुषांची जयंती वेगवेगळे सामाजिक उपक्रम घेतच साजरी केली. ज्यामुळे काहीतरी समाजाला नवीन इन आणि चांगली शिकवण मिळेल, समाजाला ज्या गोष्टीचा आधार होईल असेच उपक्रम हे विद्यार्थी करत असतात. आणि मग त्यांचं समाजाविषयी असलेलं प्रेम हे वेळोवेळी दिसून येतं.
Share your comments