कृषी विषयाचा समावेश शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्याचा प्राथमिक अहवाल हा शिक्षण विभागाने स्वीकारला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा शेतीविषयक अभ्यास होईल. याचा उपयोग विद्यार्थ्यांना नक्कीच होईल. शेतीकडे विद्यार्थ्यांचा कल वाढेल.
तसेच शेती व शेती व्यवसाय करणाऱ्यांबद्दल जाणीव व संवेदनशीलता निर्माण होईल, राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी यासंदर्भातील अहवाल सत्तार यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे सुपूर्त केला आहे.
शालेय विद्यार्थ्यांना जर शेतीविषयक ज्ञान मिळाले तर पुढील जीवनात त्यांना त्यांचे महत्व समजण्यास उपयुक्त ठरेल. शिक्षणविषयक आराखडा तयार करताना पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी, नववी आणि दहावी अशा स्वरूपात शेतीविषयक अभ्यासक्रम ठेवावा.
आता शेतीला दिवसा वीज! मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचे लोकार्पण..
कृषी प्रशिक्षणासाठी जी काही मदत आणि साहित्य लागेल ती पूर्ण करण्याची भूमिका सत्तार यांनी सांगितली. शेती अभ्यासक्रमातून शेती उपाययोजना, व्यवसाय संधी, शेतीचे महत्व, शेतीविषयक जाणीव अशा अनेक बाबींकडे लक्ष केंद्रित करून विद्यार्थ्यांचं सर्वांगीण विकास साधता येऊ शकतो. असे राज्य कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
मोदींचा 2 हजाराचा 14 वा हप्ता मे महिन्यात होणार जमा, शेतकऱ्यांनो केवायसी करा...
राज्यात शिक्षण व्यवस्थेत क्रीडा, व्यक्तिमत्व विकास, सामान्य ज्ञान, गणित, इतिहास, भूगोल या विषयाचे अध्ययन विद्यार्थी करत असतात. मात्र भारतात पारंपरिक व्यवसाय म्हणून शेतीला ओळखले जाते.
शेतमाल तारण कर्ज योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर, शेतमालावर 75 टक्यांपर्यंत कर्ज मिळणार..
आता शेतकऱ्यांची बांध कोराकोरी होणार बंद! 1 जुलैपासून होणार 'सॅटेलाईट' जमीन मोजणी
...तर तुमच्या घरी धुणीभांडी करतो, भाजप नेत्याचे राहुल कुल यांना आव्हान
Share your comments