1. बातम्या

Agriculture Business Ideas: बक्कळ पैसे देणारे शेतीतील 'हे' चार प्रयोग

जर आपल्याकडे शेती आहे आणि आपल्याला शेतीसह व्यवसाय करण्याची इच्छा असेल तर हा लेख तुमची नक्कीच मदत करेल. हे शेतीशी संबंधित असल्याने आपल्याला अधिक भांडवल लागणार नाही. हे व्यवसाय आपण नंतर वाढवूही शकतो पण सुरुवातील आधी कमी स्वरुपात सुरू करा.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


जर आपल्याकडे शेती आहे आणि आपल्याला शेतीसह व्यवसाय करण्याची इच्छा असेल तर हा लेख तुमची नक्कीच मदत करेल. हे शेतीशी संबंधित असल्याने आपल्याला अधिक भांडवल लागणार नाही. हे व्यवसाय आपण नंतर वाढवूही शकतो पण सुरुवातील आधी कमी स्वरुपात सुरू करा.  चला तर मग आपण या व्यवसायाची माहिती घेऊ.

फुलांची शेती - जर आपण फुलांची शेती कराल तर आपल्याला नक्कची मोठा फायदा मिळेल. या शेतीत एक गोष्ट लक्षात ठेवा आपण योग्य प्रकारे बाजारपेठे शोधावी. दुसरी गोष्ट म्हणजे एकाच प्रकारची फुले न फुलवता विविध प्रकारची फुलांची लागवड आपल्या शेतात करावी. आपल्या देशातील बाजारात काही विदेश प्रकारच्या फुलांना प्रचंड मागणी आहे, विशेष म्हणजे ही फुलांची लागवड आपल्याकडेही केली जाते. या फुलांची माहिती घेऊन आपण शेती केल्यास आपण पैसा मिळवू शकतो. यासह काही औषधगुणी फुलांची शेती करावी.

मशरुमची शेती - मशमरुच्या शेतीमधून ही आपण चांगली कमाई करु शकतो. या शेतीतून आपण कमी वेळात अधिक कमाई करु शकतो. आपण स्वत मशरुमचा व्यवसाय सुरू करू शकतो, पण यासाठी आपल्याला याविषयी माहिती असणं आवश्यक आहे. प्रत्येक राज्य सरकारकडून याविषयीचे प्रशिक्षण दिले जाते. जिल्हा कृषी कार्यालयामार्फत मोफत प्रशिक्षण दिले जाते.

मधुमक्षिका पालन

मधुमक्षिका पालनातून आपण आपले उत्पन्न दुप्पट करु शकतो. मध हे औधषासाठी वापरले जाते, यामुळे याला मागणी खूप आहे. आपल्या शेतीसह आपण मधुमक्षिका पालन केले तर आपल्याला नक्कीच मोठा फायदा होईल. जागतिक पातळीवरही मधाची मागणी असते. हा व्यवसाय करण्यासाठी सरकारकडून प्रशिक्षण आणि अनुदानही मिळते.

शीतगृह आणि गोदामे  -

बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांना बाजारात शेतमालासाठी योग्य भाव मिळत नसला तरी शेतकरी तो माल विकत असतो. कारण शीतगृह आणि गोदामे नसल्याने आपला शेतमाल शेतकरी ठेवू शकत नाही. यामुळे बाजारात मिळेल त्याला दराने शेतमाल विकावा लागतो. परंतु जर गोदामे असले तर शेतकरी आपला माल टिकवून आवश्यक त्यावेळी बाजारात विकू शकतो. जर आपण गोदामे किंवा शीतगृह उभारुन यातून पैसा कमावू शकता. सुरुवातीला आपण छोट्या प्ररकारची गोदामे उभारावीत.

English Summary: Agriculture Business Ideas: this four farm expriement produce more money Published on: 01 July 2020, 05:19 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters