अर्थसंकल्प हा छोटे व्यापारी आणि शेतकरी यांना केंद्रस्थानी ठेवून बनवला जाऊ शकतो. याचे संकेत स्वतः प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या एका वक्तव्यात दिले आहेत. बजेट सत्र सुरू होण्याच्या अगोदर पीएम मोदी यांनी म्हटले की, भारताच्या इतिहासात पहिल्यांदा 2020मध्ये एक नाहीतर बऱ्याच आर्थिक पॅकेजची घोषणा केली गेली.
या गोष्टी जर आपण विचार केला तर 2020 मध्ये भरपूर प्रकारचे मिनी बजेट आणले गेले. ज्यामुळे शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना फायदेशीर सिद्ध झाले. अशा पद्धतीने 2021 चा अर्थसंकल्प ही चार-पाच छोटे बजेट मिळून असेल.
नव्या दशकाचा नवा बजेट
देशाच्या उज्ज्वल भविष्य विषयी बोलताना मोदी म्हणाले की, नव्या दशकाची सुरुवात झाली आहे, त्यामुळे या बजेटचे महत्व वेगळे आहे. जे आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला सहाय्यक ठरेल. मोदी यांच्या भाषणानंतर एक अंदाज लावला जात आहे की, आजच्या बजेटमध्ये सरकार कृषी सुधारणांसाठी विशेष प्रकारचे पावले उचलतील. याचे संकेत स्वतः सरकारने बजेट सत्राच्या पहिल्या दिवशी दिले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या आर्थिक पाहणी अहवालमध्ये कृषी क्षेत्राच्या महत्त्वाच्या भागांवर जोर दिला गेला आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या भाषणानंतर पाहिले तर आर्थिक सर्वेक्षण रिपोर्टला शेती क्षेत्राला रोजगाराचे उत्तम स्त्रोत असल्याच्या रूपात पाहिले गेले आहे. या रिपोर्टमध्ये जास्त उत्पादन देणाऱ्या बियाण्यांचा वापर, बियाण्यांच्या विविध प्रजातींना बदलण्याची गरज तसेच बियाण्याची तपासणी करून उत्पादन वाढवण्याच्या पद्धती याविषयी माहिती दिली गेली आहे.
मार्केट तज्ञांच्या मते सरकार कृषी क्षेत्रामध्ये पशुपालन, मत्स्यपालन, डेअरी आणि पोल्ट्री उद्योग यामध्ये मोठे पाऊल उचलू शकतात. तसेच कृषी उत्पादन व इतर कृषीच्या महत्वाच्या गोष्टीसाठी व मार्केटिंगसाठी महत्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात.
Share your comments