1. बातम्या

डॉ.पं.दे.कृ.वि, अकोला येथे कृषी व्यवयास व स्टार्टअप ला प्रोत्साहन देण्यासाठी ॲग्री बिझनेस इनक्युबेशन सेंटर कार्यक्रम संपन्न

आझादीच्या अमृत महोत्सवात शेतकऱ्यांच्या सहभागाला आमचे प्राधान्य आहे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
डॉ.पं.दे.कृ.वि, अकोला येथे कृषी व्यवयास व स्टार्टअप ला प्रोत्साहन देण्यासाठी ॲग्री बिझनेस इनक्युबेशन सेंटर कार्यक्रम संपन्न

डॉ.पं.दे.कृ.वि, अकोला येथे कृषी व्यवयास व स्टार्टअप ला प्रोत्साहन देण्यासाठी ॲग्री बिझनेस इनक्युबेशन सेंटर कार्यक्रम संपन्न

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापिठ येथे कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 26 एप्रिल 2022 रोजी अॅग्री बिझनेस इनक्यूबेषन सेंटर करण्यात आले कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्या अंतर्गत कृषी क्षेत्रातीलना विण्यपुर्णता आणि कृषी उद्योजकता आदी घटकांसह कृषी व शेतकरी कल्याणमंत्रालय, भारत सरकार द्वारा राबविण्यात येत आहे.

कृषी व्यवयास व स्टार्टअप ला प्रोत्साहन देण्यासाठी अॅग्री बिझनेस इनक्युबेशन सेंटर (राबी) डॉ. पं.दे.कृ.वि. अकोला येथे दिनांक 26 एप्रिल 2022 रोजी कार्यक्रमाला नविन उद्योजक, शेतकरी उपस्थितीत होते. कार्यक्रम हा ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आला.

या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. एस. जे. गहुकर (प्रमुख व मुख्य अन्वेषक) अॅग्री बिझनेस इनक्यूबेशन सेंटर डॉ. पं.दे.कृ.वि. अकोला यांनी केले व कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणुन डॉ. संजय लाकडे ( संचालक, नयन मेकाट्रॉनिक्स, पुणे) व श्री. पंकज महल्ले (संस्थापक ग्रामहित यवतमाळ) यांनी कृषी उद्योजक व नविन स्टार्टअप यांना व्यवसायाचे नियोजन व व्यवसाय यशस्वीतेसाठी लागणा-या बाबी बद्दल मार्गदर्शन केले.

यशस्वी स्टार्टअपस् ने आपले उत्पादने व यंत्रांची माहिती सादर केली तसेच उपस्थीत शेतक-यांनी त्यांच्या शंकांचे निरसरण करुण घेतले.

या योजने अंतर्गत युवक व अस्तीत्वात असलेल्या स्आर्टअपसाठी कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांचे मार्फत कार्यक्रम सुरू करण्यात आला. अॅग्री बिझनेस इनक्युबेषन सेंटर मध्ये या कार्यक्रमा अंतर्गत दोन प्रकारांचा समावेष आहे प्री-सीड स्टेज फंडींग व सीड स्टेज फंडींग. ज्यांच्याकडे कृषी आणि संबंधीत क्षेत्रात व्यवसाय करण्याची नाविण्यपुर्ण कल्पणा

आहे त्यांच्यासाठी प्री-सीड स्टेज फंडींग प्रोग्राम एक व्यासपीठ आहे. या कार्यक्रमात सर्व औपचारीकता पुर्ण झाल्यानंतर रू. 5 लक्ष पर्यंतचे आर्थिक सहाय्य करण्यात येते. 

सीड स्टेज फंडींग या कार्यक्रमा अंतर्गत कृषी व संबंधीत क्षेत्रातील विद्यमान स्टार्टअप, किमान व्यवहार्य उत्पादन, प्रोटोटाईप / सेवा इत्यादी साठी रू. 25 लक्ष पर्यंतचे आर्थिक सहाय्य करण्यात येते.

डॉ. पंजाबराव देषमुख कृषी विद्यापीठाचे सन्माननिय कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले. यांचे मार्गदर्शनात व संशोधन संचालक डॉ. व्ही. के. खर्च व डॉ. वाय. बी. तायडे, अधिष्ठाता, तसेच डॉ. आर. एम. गाडे, संचालक विस्तार शिक्षण यांच्या सहकार्याबद्दल डॉ. एस. जे. गहुकर ( प्रमुख व मुख्य अन्वेषक) अॅग्री बिझनेस इनक्यूबेशन सेंटर डॉ. पं.दे.कृ. वि. अकोला यांनी आभार मानले.

 

प्रतिनिधी - गोपाल उगले

English Summary: Agri Business Incubation Center Program for Promoting Agribusiness and Startups at Dr. P.D. Krivi, Akola Published on: 26 April 2022, 10:29 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters