1. बातम्या

हुर्ररररर...हवेतच; बैलगाडा शर्यत सुरू करण्याला पुन्हा ब्रेक?

ललिता बर्गे
ललिता बर्गे

नवी दिल्ली - राज्यातील हजारो गाडी मालकांचा आणि शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे बैलगाडा शर्यत. सुमारे ४०० वर्षांची परंपरा असलेल्या बैलगाडा शर्यतीवर सध्या बंदी आहे. दावण ते संसद अशा शर्यत सुरू करण्याच्या प्रयत्नाला पुन्हा ब्रेक लागण्याची शक्यता आहे.मंत्रिमंडळाच्या फेररचनेत खातेपालट झाल्याने नव्या मंत्र्यांवा पुन्हा विषय अवगत करावा लागणार आहे. त्यामुळे शर्यत पुन्हा चालू करण्याकरिता पुनश्च हरिओम करावा लागणार असल्याचे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री परशोत्तम रुपाला यांची भेट घेतली. बैलाचा संरक्षित यादीतील समावेश वगळण्याची मागणी केली. यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने दीर्घकालीन परंपरा असलेल्या बैलगाडा शर्यतीवर बंदी घातल्याची माहिती कोल्हे यांनी दिली. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त प्रमाणात बैलगाडा शर्यती खेड, आंबेगाव, जुन्नर याच भागात होतात. बैलगाडा हाच तिथल्या जनतेचा प्रमुख सांस्कृतिक उत्सव बनला आहे. खेड, जुन्नरच्या लोकांच्या मनात बैलगाडा शर्यतीचं वेड इतकं रुजलंय, की त्यांच्या लग्नपत्रिका, वास्तुशांतीची निमंत्रणे, अगदी दशक्रिया विधीच्या कार्यक्रमाच्या पत्रिकेवरही बैलाचे पळतानाचे फोटो असतात.

ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्टर डोस:

राज्यातील ग्रामीण भागात बैलगाड्या स्पर्धांचे प्रचंड आकर्षण आहे.  कोट्यावधी रुपयांची उलाढाल यामाध्यमातून होते. शर्यतीसाठी वापरलेल्या खिलार खोंडाला मोठ्या प्रमणावर मागणी असते. बैलांच्या पौष्टिक खुराकासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. शर्यत बंद असल्यामुळे उलाढालीला 'ब्रेक' लागला आहे. 

Like this article?

Hey! I am ललिता बर्गे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters