ऊस दरावरून सध्या शेतकरी आक्रमक पवित्रा घेत आहेत. आता रयत क्रांती संघटनेनं (Ryat Kranti Sanghatana) ऊसाला प्रतिटन 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा अशी मागणी केली आहे. यासाठी ते रस्त्यावर उतरले आहेत.
रयत क्रांती सघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी बेळगावातील गणेशपूर रोडवरील साखर आयुक्तालयाला टाळे ठोकले. त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक केली आहे. यामुळे वातावरण तापले होते.
रयत संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बेळगावात साखर आयुक्तालयास टाळे ठोकले. या आंदोलनामुळं पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. योग्य दर मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.
महाराष्ट्रात टाटा पॉवर उभारणार 150 मेगा मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प...
राजकारणात एकमेकांच्या विरोधात असलेल्या साखर कारखानदारांनी ऊस दरप्रश्नी मौन बाळगलं असल्याचा आरोप रयत संघटनेतर्फे करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र देखील राजू शेट्टी आंदोलन करत आहेत.
'शेती फायदेशीर करण्यासाठी, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मोदी सरकार सातत्याने प्रयत्न सुरु'
दरम्यान, महिनाभर आंदोलन करुनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सहकार मंत्र्यांनी अद्याप याबाबत योग्य तोडगा काढला नाही. त्यामुळं संतापलेल्या रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावातील गणेशपूर रोडवरील साखर आयुक्तालयाला टाळे ठोकले.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! आता शेतकऱ्यांना कमी किमतीत मिळणार खत
शेतकऱ्यांची वीज पुन्हा तोडण्यास सुरुवात, पिके लागली जळू
शेतकऱ्यांनो शेळीपालन व्यवसायात दूध उत्पादन करून कमवा लाखो रुपये, वाचा सविस्तर..
Share your comments