1. बातम्या

नवीन डाळींचा हंगाम सुरू झाल्यानंतर किलोमागे उतरणार १० रुपयांचा दर

KJ Maharashtra
KJ Maharashtra
डाळींचे दर घसरणार

डाळींचे दर घसरणार

गेल्या काही दिवसांपासून डाळींचे भाव कडाडले होते. परंतु देशातील राजस्थान, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात दरवर्षी होणाऱ्या डाळींच्या उत्पादनात यंदा झालेल्या अवकाळी पावसामुळे घट झाली आहे. या प्रमुख डाळ उत्पादन करणाऱ्या राज्यांमध्ये शेकडो क्विंटल डाळ खराब झाल्याने त्याचा फटका ही  डाळ खरेदी करणाऱ्या मिलला  बसला आहे.

हेही वाचा : येवल्यात लाल कांद्याच्या भावात घसरण; शेतकरी चिंतेत

मुंबई एपीएमसी मध्ये 80 ते 110 रुपये किलोने डाळिंबाची विक्री केली जाते. परंतु एप्रिल मध्ये नवीन डाळींचा हंगाम सुरू झाल्यानंतर किलोमागे पाच ते दहा रुपये दर उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डाळींची सगळ्यात जास्त खरेदी नाफेड करून केले  जाते. परंतु निर्यातीबाबत  कुठलाही निर्णय अजून झालेला नसल्याने त्याचा फटका निश्चितच उत्पादकांना बसणार आहे.

हेही वाचा : राज्याच्या ‘या’ भागात विजांसह अवकाळी पावसाची शक्यता

गेल्या चार वर्षांचा विचार केला तर डाळींच्या भावामध्ये सलग वाढ होताना दिसत आहे. दोन महिन्यांपूर्वी असणाऱ्या उडीद डाळीच्या भावात वाढ होऊन पाच ते दहा रुपयांचा फरक पडलेला आहे. त्यामुळे उडीदडाळ 90 ते 115 रुपये प्रति किलो तर मुगडाळ 95 ते 115 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. 

हरभरा डाळी मध्ये आवक वाढल्याने घट झाली असून  57 ते 63 रुपये किलो वर पोहोचले आहे. तूरडाळीची आवडल्यामुळे भावात घट होऊन 78 ते 98 रुपये किलो झाली आहे.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters