आयपीएल’मधील भरपूर लोकांच्या मनातील टीम तसेच सर्वाधिक यशस्वी मानली जाणारी टीम मात्र, ‘मेगा ऑक्शन’मध्ये अनेक मॅच विनर खेळाडू या संघातून दुसऱ्या संघात गेले. त्यानंतर ‘मुंबई इंडियन्स’चे दिवसच फिरल्याचे चित्र आहे. यंदाच्या आयपीएलच्या 15व्या पर्वात मुंबईचा सलग 5वा पराभव झाला.त्यामुळे मुंबई संघाचे चाहतेही निराश झाले आहेत.
किंग्स इलेव्हन पंजाबने बुधवारी (ता. 13) झालेल्या सामन्यात मुंबईला धूळ चारली. मुंबई इंडियन्सच्या हाता-तोंडाशी आलेला विजय अक्षरक्ष: खेचून घेतला
नि अवघ्या 12 धावांनी रोहितची आर्मी चितपट झाली.मुंबईचा सलग पाचवा पराभव ठरलाय.
रोहित शर्मावर कडक कारवाई
मुंबई इंडियन्सच्या सततच्या पराभवामुळे कॅप्टन रोहित शर्माही निराश झालाय.. त्यात त्याला व मुंबई संघालाही आणखी एक झटका बसला. पंजाबविरुद्धच्या सामन्यात ‘स्लो ओव्हर रेट’मुळे कॅप्टन रोहितसह (Rohit Sharma) संपूर्ण टीमवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ‘आयपीएल कमिटी’ने ही कारवाई केली.
रोहित शर्माला 24 लाखांचा दंड ठोठावण्यात आला, तर मुंबई इंडियन्सच्या उर्वरित खेळाडूंना 6 लाख किंवा 25 टक्के सामन्यातील फी, यापैकी जो कमी असेल, तो दंड ठोठावण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सवर झालेली ही दुसरी कारवाई आहे. यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध झालेल्या मुंबईच्या पहिल्या मॅचच्या वेळीही मुंबईवर ही कारवाई करण्यात आली होती.
दरम्यान, रोहित शर्माला इशाराही देण्यात आला आहे, की पुढील सामन्यातही अशीच परिस्थिती राहिल्यास
एका सामन्यासाठी रोहितवर बंदीची कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे रोहितला यापुढे मॅच खेळतानाच घड्याळाच्या काट्यावरही नजर ठेवावी लागणार आहे.
मुंबई इंडियन्स’साठी रस्ता कठीण
मुंबई इंडियन्सचा यंदा सर्वच 5 सामन्यांत पराभव झाला आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी ‘मुंबई इंडियन्स’ला आता 9 पैकी 8 सामने जिंकावे लागणार आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्ससाठी या पुढचा प्रत्येक सामना ‘करा वा मरा’ असा असणार आहे. कारण, एका सामन्यातही पराभव मुंबईला आता परवडणारा नाही.
Share your comments