गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली आहे. यामुळे याचा फटका सर्वसामान्य लोकांना बसत आहे. असे असताना मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी करून दिलासा दिला आहे. असे असताना मोदी सरकार अजून एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रत्येकाला याचा फायदा होणार आहे. आता लवकरच खाद्यतेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने मंगळवारी मार्च 2024 पर्यंत वार्षिक 2 दशलक्ष टन क्रूड सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या आयातीवरील सीमाशुल्क आणि कृषी उपकर हटवण्याची घोषणा केली आहे. यामुळे आता याचे दर आवाक्यात येण्याची शक्यता आहे. तेलाच्या वाढत्या किमतीमुळे सर्वांचे आर्थिक बजेट कोसळले होते.
यामध्ये 2022-23 आणि 2023-24 या आर्थिक वर्षांमध्ये वार्षिक 20 लाख टन कच्चे सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलावर आयात शुल्क लावले जाणार नाही. यामुळे देशांतर्गत वस्तूंच्या किमती खाली येतील, आणि महागाई नियंत्रणात ठेवण्यास मदत करेल, असा सरकारचा विश्वास आहे.
म्हैस खरेदीवर सरकार शेतकऱ्यांना देणार ५०% अनुदान, जाणून घ्या
याबाबत अनेक दिवसांपासून नाराजी व्यक्त केली जात होती. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. यामध्ये म्हटले आहे की, या निर्णयामुळे ग्राहकांना लवकरच मोठा दिलासा मिळेल. तसेच स्टील आणि प्लास्टिक उद्योगात वापरल्या जाणाऱ्या काही कच्च्या मालावरील आयात शुल्क हटवण्याचा निर्णयही घेण्यात आला होता.
Banana : काय सांगता! 13 इंच लांब केळी, केळी बघून कृषीतज्ञही झाले अवाक..
दरम्यान, इंधनाच्या किंमती गगणाला भिडल्यामुळे देशात अनेक गोष्टींच्या किंमती वाढल्या आहेत. यातच खाद्य तेलाच्या किंमतींमध्ये तर प्रचंड वाढ झाली आहे. वाढत्या महागाईमुळे अनेकांचे बजेट कोलमडले आहे. यामुळे आता सरकारकडून काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
यावर्षीच्या अतिरिक्त उसामुळे पुढील वर्षीच्या गाळपाबाबत अजित पवारांनी घेतला मोठा निर्णय
रेशन घेण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल, सर्वसामान्य लोकांना मोठा धक्का
अजून किती शेतकऱ्यांच्या आत्महत्याची वाट बघणार, अतिरिक्त उसाबाबत वासुदेव काळे आक्रमक
Share your comments