1. बातम्या

कांदा नंतर मोहरी तेलाच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या काय आहे कारण

सध्या देशभर कांद्याची चर्चा जोरात सुरू आहे. देशातील विविध ठिकाणी कांदे ७० रुपये ते १०० रुपयांपर्यंत विकले जात आहे. पण मोहरीचे तेल गेल्या ४ ते ५ दिवसात मोहरीच्या तेलावर (सरसो तेल) प्रती किलो ८ ते १५ रुपयांनी वाढ झाली आहे.

KJ Staff
KJ Staff


सध्या देशभर कांद्याची चर्चा जोरात सुरू आहे. देशातील विविध ठिकाणी कांदे  ७० रुपये ते १००  रुपयांपर्यंत विकले जात आहे. पण मोहरीचे तेल गेल्या  ४ ते ५ दिवसात मोहरीच्या तेलावर (सरसो तेल) प्रती किलो ८ ते १५  रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षाची चर्चा केली तर मोहरीचे तेल प्रति लिटर ५० रुपयांनी महाग झाले आहे. सध्या त्याची किंमत नियंत्रणाखाली येत असल्याचे दिसत नाही. मोहरीचे कमी उत्पादन आणि तेलांच्या परराष्ट्र धोरणात काही बदल झाल्यामुळे भाव वाढण्यामागचे मुख्य कारण आहे . पण  गेल्या चार दिवसांत एका क्विंटल मोहरीच्या भावात ३०० रुपयांची वाढ झाल्याने पुन्हा तेलाच्या भावात वाढ झाली आहे.

सरकारने मोहरीच्या तेलातील इतर तेलाच्या भेसळीवर बंदी घातली आहे. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (एफएसएसएएआय) मोहरीच्या तेलाच्या मिश्रणावर बंदी १ ऑक्टोबरपासून लागू झाली. सरकारचे म्हणणे आहे की या निर्णयाचा फायदा ग्राहकांना तसेच मोहरी पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना होईल. मोहरीचे तेल एकाच वर्षात ५०  रुपयांनी महाग झाले. ऑक्टोबर २०१९  मध्ये मोहरीचे तेल ८० ते १०५ रुपये प्रति लीटर विकले गेले असा विश्वास किरकोळ तेलाचे  व्यापारी हज इलियास यांनी घेतला. पण जानेवारीत पाम तेलावरील निर्बंधामुळे एक लिटर मोहरीच्या तेलाची किंमत ११५  वरून १२० रुपये प्रतिलिटर झाली. मग लॉकडाउन मध्ये त्यात वाढ होत झाली. मोहरीचे नवीन पीक उत्पादन कमी होते. दुसरीकडे १ ऑक्टोबरपासून FASSI ने मोहरीच्या तेलात मिसळण्यास बंदी घातली.

जर तुम्ही ब्रँडेड मोहरीच्या तेलाच्या किंमतीबद्दल बोलायचे तर बाजारात लिटर १३० ते १४५ रुपये पोहोचले आहे. ब्लेंडिंग इन्स्पेक्टर, रिटायर्ड केसी गुप्ता म्हणतात की, मोहरीच्या तेलात  इतर तेलांचे मिश्रण एका विशिष्ट प्रमाणात मिसळले जाते. आतापर्यंत २०%  मोहरीचे तेल मिसळले गेले होते. पण सरकारने ते थांबवले आहे. यामागील सरकारचा तर्क असा आहे की, एकदा शुद्ध मोहरी वापरली की मोहरीचा वापर वाढेल. दुसरे म्हणजे, काही लोक ब्लेंडिंगच्या नावाखाली भेसळ करण्याचा व्यवसाय करीत होते. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने आगामी २०२०-२१ (जुलै-जून) पीक वर्षात  ३७० लाख टन तेलबिया उत्पादन करण्याचे लक्ष्य ठेवले असून त्यापैकी मोहरी उत्पादनाचे लक्ष्य ९३. ३६ लाख टन आहे. केंद्र सरकारने मोहरीची किमान आधारभूत किंमत (एमएसपी)  २२५ रुपयांनी वाढवून ४,६५० रुपये प्रतिक्विंटल केली आहे.

English Summary: After onion price now mustard oil price has increased , know all reason Published on: 30 October 2020, 04:17 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters