1. बातम्या

लई भारी! या जातीची आफ्रिकन शेळी विकली गेली लाखो रुपयाला, जाणुन घ्या याविषयी सविस्तर

भारतात समवेतच राज्‍यात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन केले जाते. पशुपालनात प्रामुख्याने शेळीपालन, कुक्कुटपालन, वराहपालन, मधुमक्षिका पालन, गाईचे पालन यांचा समावेश होतो. पशुपालनातून अनेक पशुपालक शेतकरी चांगली मोठी कमाई करतात. नाशिक जिल्ह्यातील माडसांगवी गावातील रहिवासी असलेले बापू कर्वे यांनीदेखील शेळीपालनातून चांगली मोठी कमाई केली आहे, बापू कर्वे हे औषध निर्माण उद्योगात काम करतात, नोकरी सोबतच एखाद्या व्यवसायाची जोड असावी त्यासाठी त्यांनी शेळी पालन करण्याचा निर्धार केला.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
boar goat

boar goat

भारत समवेतच राज्‍यात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन केले जाते. पशुपालनात प्रामुख्याने शेळीपालन, कुक्कुटपालन, वराहपालन, मधुमक्षिका पालन, गाईचे पालन यांचा समावेश होतो. पशुपालनातून अनेक पशुपालक शेतकरी चांगली मोठी कमाई करतात. नाशिक जिल्ह्यातील माडसांगवी गावातील रहिवासी असलेले बापू कर्वे यांनीदेखील शेळीपालनातून चांगली मोठी कमाई केली आहे, बापू कर्वे हे औषध निर्माण उद्योगात काम करतात, नोकरी सोबतच एखाद्या व्यवसायाची जोड असावी त्यासाठी त्यांनी शेळी पालन करण्याचा निर्धार केला.

त्यांनी 2016 पासून शेळी पालन करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला बापू यांनी शिरोही व कोटा या जातींच्या बकरीचे पालन केले, यात चांगले घवघवीत यश प्राप्त केल्यानंतर त्यांनी दोन वर्षांपूर्वी आफ्रिकन जातीची बोअर शेळीपालन करण्याचे ठरवले. बापू यांनी शास्त्रीय पद्धतीने बोअर जातीच्या शेळी पालन केले, योग्य व्यवस्थापन करून त्यांनी यातून चांगली मोठी कमाई केली. नुकतेच बापू यांनी बोअर जातीच्या चार शेळ्या विक्रीसाठी काढल्या, या शेळ्या अहमदनगर व जालना जिल्ह्यातील पशुपालकांनी तब्बल एक लाख अकरा हजार रुपयांनी खरेदी केल्या. बापू यांच्या मते त्यांच्याकडे असलेली शेळी ही प्रजननासाठी एक उत्तम ब्रीड आहे त्यामुळे या शेळ्यांना एवढा चांगला बाजारभाव मिळाला.

शास्त्रीय पद्धत्त वापरून शेळीपालनात झाले यशस्वी

बापू यांनी 2016 पासून ते आत्ता पर्यंत म्हणजे जवळपास पाच वर्ष यशस्वीरीत्या शेळीपालन व्यवसाय सुरू ठेवला आहे, ते शास्त्रीय पद्धतीने शेळी पालन करतात. बापू हे अनेकदा त्यांच्या कामानिमित्त परदेशात हजेरी लावीत असत, परदेशात असताना त्यांनी अनेक गोट फार्मला व्हिजिट केले आहे, आणि यातून त्यांनी शेळीपालन व्यवसायातील बारकावे चांगल्या पद्धतीने आत्मसात केले आहेत.

त्यामुळे बापू कर्वे शेळी पालन व्यवसायात यशस्वी झाले आहेत. त्यांनी शेळीपालन व्यवसायातील सर्व बारकावे व्यवस्थितरीत्या समजून स्वतःचा लकी गोट फार्म उभारला आहे. त्यांच्याकडे असलेले मार्केटिंग कौशल्याचा वापर करून त्यांनी हा व्यवसाय चांगलाच विस्तारला आहे.

English Summary: african goat of this breed were sold for millions of rupees Published on: 22 December 2021, 06:44 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters