रस्त्यासाठी गांगलगाववासीयांचे तिसऱ्या दिवशी उपाषण सुरूच
चिखली : गांगलगाव ते कोलारा या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून सदर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी या मागणीसाठी मागील २१ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण गांगलगाव येथील नागरीकांनी सुरू केले आहे . उपोषणाचा आजचा तिसरा दिवस असून प्रत्यक्ष कामाला जोपर्यंत सुरुवात होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी गावकऱ्यांनी भूमिका आहे . चिखली मेहकर राज्य महामार्ग ५४८ सी ला जोडरस्ता असलेल्या गांगलगाव कोलारा हा जोडरस्ता आहे .
सदर रस्ता हा गांगलगाव गावठाण जवळील २७० मीटर रस्ताला पांदण रस्त्याला लागून झाडे झुडपे असल्यामुळे या रस्त्याला जंगलाचे स्वरूप आले आहे . पावसाळ्यात हा रस्ता चिखलमय होवून गावकऱ्यांना त्रासदायक ठरतो . विशेष म्हणजे येथे सेंट्रल बँक असून बँकेत कामकाजा निमित्त येणाऱ्या ग्राहकांना तसेच शाळेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना या रस्त्यावरून येतांना प्रचंड त्रास होत आहे . मागील ५५ वर्षापासून या रस्त्याचा प्रश्न कायम प्रलंबीत आहे . यापूर्वी याच रस्त्याचा प्रश्न विधीमंडळात सुध्दा गाजला होता . मात्र अजूनही या रस्त्याच्या रुंदीकणाचा व मजबुतीकरणाचा मुहर्त प्रशासनाला सापडला नाही .
शेवटी या रस्त्याच्या कामासाठी गावकऱ्यांनी उपोषणाचा मार्ग पत्कारला आहे . २१ फेब्रुवारी पासुन गावकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे . दररोज या उपोषण मंडपात उपोषणकर्त्यांची संख्या वाढत आहे . याबाबद जिल्हाधिकारी व तहसीलदार चिखली यांना वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाला जाग आली नाही . दरम्यान रस्त्याकामला सुरूवात होत नाही तोपर्यंत गावकऱ्यांनी मागे न हटण्याची भूमिका घेतल्याने हे उपोषण चिघळत आहे . सध्या गावकऱ्यांच्या वतीने गावचे प्रथम नागरिक गणेश म्हस्के , नितीन म्हस्के , गजेंद्र म्हस्के , राजेंद्र म्हस्के
ऋऋषिकेश म्हस्के , प्रल्हाद म्हस्के , सुनील म्हस्के यासह सुमारे २०० च्या वर ग्रामस्थ उपोषण करीत आहेत .
गांगलगाव ते कोलारा या रस्त्यासाठी गांगलगाव वासियांनी मागील तीन दिवसापासून उपोषण सुरू केले आहे यासंदर्भात अद्यापही प्रशासनाने दखल घेतली नाही . आता प्रशासनाने उपोषणकर्त्यांचा अंत पाहू नये , अन्यथा गावकऱ्यांच्या या मागणीसाठी आपण लोकशाहीच्या मार्गाने पुन्हा तिव्र आंदोलन करू -ऋषीकेश बबनराव म्हस्के सामाजिक कार्यकर्ते , गांगलगाव
Share your comments