मॉन्सूनने जून महिन्यात केलं ओलचिंब; झाला सरासरीपेक्षा जास्त पाऊस

Thursday, 02 July 2020 07:59 PM


मॉन्सून हंगामाची सुरुवात यंदा दमदार झाली असून मॉन्सूनचा पहिला महिना जूनमध्ये दमदार पाऊस झाला. राज्यात २५१.४ मिलीमीटर पाऊस झाला. मॉन्सूनच्या पहिल्या महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा २१ टक्के अधिक पाऊस पडल्याचे हवामान विभागाने सांगितले.  मॉन्सून राज्यात दाखल झाल्यानंतर साधरण एक आठवडा पावसाने विश्रांती घेतली तरी पावसाने महिन्याची सरासरी ओलांडली आहे. दुष्काळग्रस्त जिल्हे म्हणून ओळख असलेल्या मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये मात्र दमदार पावसाने हजेरी लावली आहे. यात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडला, येथे सरासरीपेक्षा १११ टक्के अधिक पावसाची नोंद झाली.  त्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यात सरासरीपेक्षा ११० टक्के अधिक पाऊस झाला.

औरंगाबादनंतर नगर जिल्ह्याने शंभरी गाठत १०३ टक्के अधिक पाऊस झाल्याची नोंद तेथे करण्यात आली. बीडमध्ये ९१ टक्के लातूरमध्ये ७९ टक्के, जालना जिल्ह्यात सरासरीपेक्षा ७२ टक्के अधिक पाऊस पडला आहे.  याशिवाय जळगाव, धुळे, नाशिक, पुणे, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यातही पावसाने सरासरी गाठली.  मॉन्सून यंदा वेळेआधी अंदमान निकोबार बेटावर पोचला होता. मात्र त्यानंतर त्याची वाटचाल काहीशी अडखळली. मॉन्सून तब्बल दहा दिवस दक्षिण अंदमानात मुक्काम करुन होता. त्यानंतर २७ जून रोजी पुन्हा आपली वाटचाल सुरू करत अरबी समुगद्रात अालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे १ जून रोजी मॉन्सून केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर मॉन्सून लगेच पश्चिम किनारपट्टी व्यापली पण लगेच त्याचा प्रवास रोखला गेला. महाराष्ट्रात मॉन्सून ११ जून रोजी दाखल झाला. 

पूर्ण राज्य चार दिवसात व्यापल्यानंतर मॉन्सूनला परत ब्रेक लागला. त्यानंतर २३ रोजी पुन्हा आपली वाटचाल सुरू करत मॉन्सूनने पुढील चार दिवसात संपूर्ण देश व्यापला.  दरम्यान मॉन्सून येणार असताना बंगालच्या उपसागरात अम्फान चक्रीवादळ आले, यामुळे मॉन्सून वेळेआधी अंदमानात दाखल झाले खरे पण अम्फान उत्तरेकडे सरकल्यानंतर मॉन्सूनची वाटचाल थांबली.  हे महाचक्रीवादळ पश्चिम बंगालमध्ये धडकले, त्यामुळे पश्चिम बंगाल, ओडिशामध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने हाहाकार माजविला.  दरम्यान जून महिन्यात देशात सरासरी १६६.९ मिलीमीटर पाऊस पडतो. खरिपाच्या पेरणीसाठी महत्वपुर्ण असलेला जून महिना बारा वर्षानंतर प्रथमच ओलाचिंब  करणारा ठरला आहे. २००८ च्या जून महिन्यामध्ये  देशात २०२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती.  यंदा जून महिन्यात देशात सर्वदूर चांगला पाऊस पडला.

average rainfall Monsoon मॉन्सून पाऊस सरासरी पाऊस rain weather department weather हवामान विभाग हवामान
English Summary: Above average rainfall in june month

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णयCopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.