गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणावर आयकर विभागाच्या धाडी टाकण्याचे सत्र सुरु आहे. यामुळे याची चर्चा सुरु आहे. अनेक नेत्यांचे कारखाने आणि त्यांची चौकशी देखील केली जात आहे. असे असताना काही दिवसांपूर्वीच सोलापूरमध्ये आयकराच्या धाडी पडल्याने खळबळ उडाली आहे. साखर कारखानदारी क्षेत्रातलं मोठं नाव असलेल्या अभिजीत पाटील (Abhijeet Patil ) यांच्या साखर कारखान्यांवर आयकर विभागाने (Income Tax Department) धाडी टाकल्या.
आयकर विभागाच्या धाडीनंतर (IT Raids) पाटील यांनी दोन वर्षांपासून अडकलेली कारखान्याच्या बिलांचे वाटप सुरु करत निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. आज झालेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बैठकीत दोन वर्षांपासून अडकलेले 30 कोटीची थकीत बिले देऊनच कारखान्याचे गाळप सुरु करण्याचा निर्णय झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
यामुळे आता कारखाना व्यवस्थित चालेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या आणि दोन वर्षांपासून बंद असलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडे 650 कोटीच्या कर्जासोबत 20-21 सालात गाळप झालेल्या चार हजार शेतकऱ्यांची ऊस बिले थकीत होती. यामुळे शेतकरी नाराज होते. यामुळे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तशी आश्वासने देण्यात आली होती.
राज्य सहकार मंत्र्यांच्या राष्ट्रीय परिषद दिल्लीत होणार, सहकारासंबंधी मोठे निर्णय होण्याची शक्यता..
यामुळे राष्ट्रवादीचा पराभव करीत शेतकऱ्यांनी अभिजित पाटील यांच्या पॅनलला मोठ्या फरकाने विजयी केले. त्यानंतर मात्र अभिजित पाटील यांच्यावर आयकर विभागाच्या धाडी पडल्याने शेतकरी चिंतेत होते. आपले पैसे मिळणार की नाही अशी चिंता त्यांना होती. मात्र आता पैसे देण्यात सुरुवात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना 2500 रुपये भाव दिला जाणार असून शेतकऱ्यांनी कारखान्याकडे उसाची नोंदणी करण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे.
Pune Rain Alert: मुसळधार! बारामतीमध्ये ढगफुटी, पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या माणसाला वाचवले..
दरम्यान, पाटील यांनी एकापाठोपाठ एक असे चार साखर कारखाने विकत घेतले आहेत. याठिकाणीच आयकर विभागाची पथकं दाखल झाली होती, तपासणी करण्यात आली हाती. यामुळे या चौकशीमधून काय समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पंढरपूरचे रहिवासी असलेले अभिजीत पाटील हे एक साखर उद्योगातील बडे प्रस्थ समजले जाते.
महत्वाच्या बातम्या;
तुळशीच्या लागवडीने बदलले शेतकऱ्यांचे नशीब, आता स्वतःची कंपनी करणार सुरू
'वारंवार सांगूनही माझ्या खात्यावर पैसे यायचे थांबत नाहीत आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांनी हेलपाटे घातले तरी त्यांचे पैसे येत नाहीत'
गॅसच्या किमती कमी करून मोदी सरकार देणार सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट? घेतला मोठा निर्णय..
Share your comments