1. बातम्या

प्लास्टिक नावाचा दानव

प्लॅस्टिकच्या बेसुमार वापरामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे, ही बाब आता लपून राहिलेली नाही.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
प्लास्टिक नावाचा दानव

प्लास्टिक नावाचा दानव

प्लॅस्टिक पोटात जात असल्याने जनावरे मृत्युमुखी पडल्याच्या घटना दिवसाआड वाचनात येतात. आता मानवी शरीरही प्लॅस्टिकच्या आक्रमणाला बळी पडण्याची चिन्हे असून, आठवडाभरात ५ ग्रॅम तर वर्षाला २५० ग्रॅम प्लॅस्टिक पोटात जात असल्याचे संशोधनातून उघड झाले आहे. प्लॅस्टिकचे संकट आता आपल्या आसपासच नव्हे तर शरीरातही शड्डू ठोकून उभे आहे. येत्या काळात ठोस उपाययोजनांसह नियोजन केले नाही तर परिस्थिती आणखी बिकट होणार, याबाबत तीळमात्र शंका नाही.वर्ल्ड वाइड फंड आणि ऑस्ट्रेलियातील न्यू कासल विद्यापीठाने याविषयी पुढाकार घेऊन जगभरात ५० ठिकाणी मायक्रो प्लॅस्टिकचे मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामांचे सर्वेक्षण केले. 

यातून पुढे आलेले निष्कर्ष मानवी आरोग्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. विविध माध्यमांद्वारे एका आठवड्यात सुमारे २ हजार प्लॅस्टिकचे कण शरीरात जातात. मानवाचे सरासरी वय ६० वर्षे गृहीत धरल्यास त्यावेळी त्याने अठरा किलो प्लॅस्टिक पोटात साठवलेलं असेल. पोटामधील इंद्रियांना बाहेरील अतिशय लहान घटकही चालत नाही. या कणांचा शरीर जोरदार विरोध करते. जर पोटात एवढ्या मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक जाणार असेल तर शरीर त्यास कसे प्रत्युत्तर देईल, याची कल्पनाच न केलेली बरी. कॅरीबॅगचा वापर वाढल्यापासून प्लॅस्टिकचा फास मानवाच्या गळ्याभोवती आवळला जात आहे.

प्लॅस्टिक टिकाऊ असल्याने त्याचा वापर वाढला पण ते कुजत नाही आणि विघटितही होत नाही. त्यामुळे प्लॅस्टिकच्या वस्तूंचा वापर संपताच त्या जमेल तिथे फेकून दिल्या जातात आणि त्यांचे कधीही न संपणारे ढीग जमा होतात. गेल्या दहा वर्षांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आणि छोटी पाकिटे यांनी हा धोका अधिक गंभीर करून टाकला आहे.भारतात दररोज १ कोटी पाण्याच्या बाटल्या पाणी पिऊन फेकल्या जातात, तर १० कोटी छोटी पाकिटे जागा मिळेल तिथे फेकून दिली जातात. त्यांचे पुन्हा काहीच होत नाही. ही पाकिटे आणि बाटल्या कुजत नाहीत, नासत नाहीत. आहे त्या अवस्थेत पडेल तिथे पडून राहतात. गायी-म्हशींच्या खाण्यामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या येतात आणि त्यांच्या पोटात जातात. 

त्यांचे परिणाम गायी-म्हशींच्या शरीरावर तर होतातच; परंतु त्यांच्या दुधांमधून तसेच दुधाच्या पिशव्यांमधूनही मानवी शरीरात प्लॅस्टिक पोचत आहे.वरील लेख सकाळ च्या बातमी पत्रात देखील छापून आला आहे, तरी देखील आपल्याला परिस्थिती चे गांभीर्य नाही. वेळीच बदल गरजेचा आहे, नाही तर आपण शिक्षित असून उपयोग काय?विचार करा, बदल करा, शेवट जवळ येण्याच्या अगोदर आता मानवी शरीरही प्लॅस्टिकच्या आक्रमणाला बळी पडण्याची चिन्हे असून, आठवडाभरात ५ ग्रॅम तर वर्षाला २५० ग्रॅम प्लॅस्टिक पोटात जात असल्याचे संशोधनातून उघड झाले आहे. प्लॅस्टिकचे संकट आता आपल्या आसपासच नव्हे तर शरीरातही शड्डू ठोकून उभे आहे. येत्या काळात ठोस उपाययोजनांसह नियोजन केले नाही तर परिस्थिती आणखी बिकट होणार, याबाबत तीळमात्र शंका नाही.

 

Nutritionist & Dietician

Naturopathist 

Amit Bhorkar  

whats app: 9673797495

English Summary: A monster called plastic Published on: 27 May 2022, 03:05 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters