आतापर्यंत एकवेळा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना अशी दोनवेळी कर्जमाफी झाली आहे. असे असताना त्यातील जाचक अटींमुळे हजारो शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे या दोन्ही कर्जमाफी एकत्र करुन सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही भेटणार आहे, असे आमदार बच्चू कडू म्हणाले.
तसेच लिलावात शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करणाऱ्यांचे हातपाय तोडू असा गर्भित इशारा बच्चू कडू यांनी यावेळी दिला. तसेच प्रहारच्या आंदोलनानंतर कर्ज थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनींची लिलाव प्रक्रिया बँकेकडून अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.
त्याच्या नेतृत्वाखाली नागपुरातील महाल परिसरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत प्रहारतर्फे आंदोलन करण्यात आले.शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी गहाण ठेवून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेतले होते. मात्र त्यापैकी अनेक कर्जखातेधारकांनी कर्जाची परतफेड केली नसल्याने बँकेकडून गहाण असलेल्या मालमत्तांचे लिलाव करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती.
या गुळाला आहे सोन्यासारखा भाव, किंमत ५१ हजार रुपये किलो, वाचा खासियत..
याबाबत अनेक कर्जदारांना नोटीसही बजावण्यात आली होती. बँकेने ही लिलाव प्रक्रिया थांबवावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने केली होती. आजची लिलाव प्रक्रिया उधळून लावण्यासंदर्भातले आंदोलन बच्चू कडू यांच्या नेतृत्वात केले. दरम्यान, तोडगा काढण्यासाठी लवकरच जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एक बैठक घेतली जाईल.
खत टंचाई, बोगस खते आणि अवाजवी खतांच्या दरामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक
त्यानंतर कर्ज प्रकरण आणि लिलाव संदर्भात निर्णय घेतला जाईल, अशी माहिती बँकेचे कार्यकारी अधिकारी चितरंजन नाईक यांनी दिली. कर्जाच्या डोंगरांखाली शेतकरी दबला आहे. या तणावामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. अशा परिस्थिती अन्न देणाऱ्या बळीराजाला साथ देण्याची गरज असताना बँकांकडून त्यांच्या जमिनीही हिसकावण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे कडू म्हणाले.
महत्वाच्या बातम्या;
कीटकनाशकाच्या बाटलीचा प्रवास, विक्रेत्याला प्रदेशात दिलेल्या मसाजचे बिलदेखील शेतकऱ्याच्या खात्यातूनच होतेय वजा, शेतकऱ्याची होतेय लूट
चारधाम यात्रा 2023: बद्रीनाथ केदारनाथ मंदिर होणार सुरू, तारीख झाली जाहीर
मोगरा करणार शेतकऱ्यांना श्रीमंत! जाणून घ्या सविस्तर..
Share your comments