1. बातम्या

८० कोटी नागरिकांना नोव्हेंबपर्यंत मिळणार गरीब कल्याण योजनेचा लाभ


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी गरिबांसाठी सुरू केलेली मोफत धान्य योजना दिवाळीपर्यंत  चालू राहणार असल्याचे सांगितले. दर महिन्याला पाच किलो गहू किंवा पाच किलो तांदूळ मोफत दिले जातील, सोबतच प्रत्येक परिवाराला दर महिन्याला एक किलो डाळ मोफत दिली जाणार आहे. या योजनेचा लाभ देशातील ८० कोटी नागरिकांना होणार आहे. दरम्यान पंतप्रधान यांनी याचे श्रेय हे शेतरी आणि कर देणाऱ्यांना दिले आहे. आपल्या देशातील अन्न भंडार भरलेले आहे. याामुळेच आज गरीब लोकांच्या घरात चूल पेटत आहे. तर करदात्यांनी प्रामाणिकपमणे कर देऊन आपले कर्तव्य पार पाडले. यामुळेच आज देशातील गरीब या संकटाशी दोन हात करत आहे.

 यासह मोदींनी संपूर्ण देशात वन नेशन वन रेशन कार्ड योजनाही लवकरच लागू केली जाणार असल्याची घोषणा केली. मागील तीन महिन्यात आपण गरीबांना मोफत अन्न धान्य दिले. पाच किलो गहू किंवा तांदूळ, एक किलो डाळ आणि एक किलो चणे असे धान्य मोफत दिले अशाच प्रकारे नोव्हेंबरच्या शेवटापर्यंत आपण गरीबांना धान्य मोफत देणार आहोत,अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

ही योजना जुलै ते नोव्हेंबर या काळातही सुरु राहणार आहे. यासाठी ९० हजार कोटींपेक्षा जास्त खर्च होणार आहे. मागील तीन महिन्यांचा खर्च जोडला तर ही रक्कम दीड लाख कोटीच्या घरात जाते. संपूर्ण भारतासाठी आपण एक स्वप्न पाहिलं होतं… अनेक राज्यांनी कोरोना काळात चांगले काम केले आहे. त्यांना आपण आवाहन करतो आहोत की वन नेशन वन रेशन कार्ड योजनेसाठीही त्यांनी सहकार्य करावे. याचा लाभ त्या गरीबांना मिळेल जे रोजगारासाठी आपले गाव सोडून इतर राज्यांमध्ये जातात. असेहीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.  

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters