1. बातम्या

अबब ! पीक विम्यासाठी राज्यातून तब्बल ७२ लाख अर्ज

यंदा पंतप्रधान पीकविमा योजनेमध्ये महाराष्ट्र राज्यातून तब्ब्ल ७२ लाख अर्ज जमा झाले आहेत. विम्याची नोंदणी करण्यासाठी उद्या म्हणजे शुक्रवार ३१ जुलै हा शेवटचा दिवस असून सरकारने जास्तीत जास्त शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान केले आहे. तसेच या योजनेसाठी कोणतीही मुदतवाढ मिळणार नसल्याचे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.

KJ Staff

या योजनेअंतर्गत बीड जिल्हा आघाडीवर असून सर्वाधिक अर्ज या जिल्ह्यातून आले आहेत. यो योजनेला मात्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागातून जास्त प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून येते. पश्चिम महाराष्ट्रात ऊसाचे सर्वाधिक उतपादन घेतले जाते. मात्र ऊस हा पीक योजनेत समाविष्ट नसल्याने या पट्ट्यातून कमी अर्ज आले आहेत.

उत्तर महाराष्ट्रातून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यावर्षी कोरोनामुळेदेखील शेतकऱ्यांना अर्ज जमा करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे अर्जाची संख्या कमी झाली आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने  योजनेचे नोटिफिकेशन काढायला उशीर केला, त्यामुळे  कमी अर्ज आले आहेत अशी चर्चा आहे. दरम्यान उद्या मुदत संपणार असल्याने राज्यभर शेतकऱ्यांसमोर समस्या तयार झाल्या आहेत. राज्य सरकारने ऐन लॉकडाऊनमध्ये मुदतवाढीस केलेली टाळाटाळ, सर्व्हर डाऊनच्या घटना, महा ई सेवा केंद्रावर होणारी लूट यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.  दरम्यान शेतकऱ्यांनी या योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. कृषी मंत्र्यांनी कोणतीच वाढ केली जाणार नसल्याचे सुचित केले आहे. तर विमा अर्ज भरताना शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात असल्याचे निर्दशनास आले आहे. 

English Summary: 72 lakh applications for crop insurance from the state Published on: 30 July 2020, 01:41 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters