1. बातम्या

7/12 उतारा येणार नव्या रुपात ; बनावटगिरीला बसणार आळा


सात बारा हे शब्द आपल्याला नेहमी कानावर पडत असतात. पण शब्द बोलण्यास जितके सोपे आहेत, पण कागदावर याचे रुप पाहिल्यास हे समजण्यास तितकेच अवघड आहेत. अनेकांना यातील बऱ्याच गोष्टी समजत नाहीत, यामुळे फसवणुकीचे प्रकार घडत असतात, मात्र आता तसे होणार नाही, कारण ७/१२ नव्या रुपात येणार असून प्रत्येकजण सहजरित्या त्याला समजू शकणार आहे.  संगणकीकृत सात-बारा उताऱ्यावर आता शासनाचा व ई- महाभूमीचा लोगो असलेला वॉटर मार्क तसेच गावाच्या नावाचा एलजीडी कोड असेल. याबरोबर शेती आणि बिनशेतीच्या उताऱ्याचा नमुना वेगवेगळा असणार आहे. सर्वसामान्य नागरिकालाही हा उतारा कळवा , या उद्देशाने सरकारने हा बदल केला आहे.

१५ ऑगस्टपासून राज्यात याची अंमलबाजवणी होणार आहे. अनेकदा बनावट सात-बारा उतारा दाखवून जमीन लाटणे, तिची खरेदी - विक्री करणे आदी प्रकार घडतात. उतारा शासकीय भाषेत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना तो समजत नाही. त्यातून हे प्रकार घडतात. त्यामुळे संगणीकृत सात-बारा उतारा आणि आठ (अ) च्या नमुन्यात बदल करण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. दरम्यान या बदलामुळे बनावटगिरीला आळा बसणार आहे. सात म्हणजे जमिनीची मालकी भोगवटादार असलेल्यांची नावे आणि त्यांच्याकडे असलेले क्षेत्र, तर बारा म्हणजे पीक - पाण्याचे नोंद असते. त्यामुळे त्याला सात - बारा उतारा म्हटलं जाते. नव्या बदलामुळे तो समजण्यास अधिक सोपा आणि माहितीपूर्ण होणार आहे.

हे आहेत बदल

 • सात- बारा आणि ८ अ वरच्या बाजूला शासनाचा लोगो व ई-महाभूमीचा वॉटरमार्क.
 • गावाच्या नावासोबत लोकल गर्व्हन्मेंट डिरेक्टरी कोड, लागवडी योग्य क्षेत्र, पोट खऱाब क्षेत्र यासोबत एकूण क्षेत्र अ +ब स्वतंत्र दर्शविणार.
 • शेतीसाठी हे. आर. चौ. मी. आणि बिनशेतीसाठी आर. चौ.मी हे एकक दर्शविले जाणार. खाते क्रमांक खातेदारांच्या नावासोबत नमूद करणार.
 • कमी केलेली नावे खोडणार.
 • नमुना ७ वर नोंदलेले परंतु निर्गत न झालेले प्रलंबित फेरफार म्हणून इतर हक्क रकान्याखाली स्वतंत्र रकान्यात दर्शविण्यात येणार.
 • भूमापन क्रमांक व उपविभाग क्रमांकावर एकही फेरफार प्रलंबित नसल्यास तसा उल्लेख करणार.
 • नमुना ७ वर नोंदविण्यात आलेला शेवटा फेरफार क्रमांक व त्याता दिनांक इतर हक्क रकान्याचे खाली शेवटच्या रकान्यात दर्शविणार.

7 -12 च्या संबंधित महत्त्वाच्या बाबी

 • सात बारा उतारा हा जमीन मालकी हक्काचा प्राथमिक व अंतरिम पुरावा असतो.
 • सात बारा उतारा हा जोपर्यंत बेकायदेशीर आहे असे ठरवले जाते तोपर्यंत तो कायदेशीर मानला जातो.
 • सात बारामध्ये पीक पाहणी नोंद केलेली असते ते दरवर्षी केली जाते.
 • जमिनीचे गटनंबर असतात त्या प्रत्येक गटासाठी एकच सातबारा असतो.
 • मालकाशिवाय दुसऱ्या व्यक्तीचे नाव, कुळ, खंड इत्यादींची नावे सातबारा उतारामधील लावण्याचा अधिकार तलाठी यांना नाही.
 • सात बारा उतारा असलेल्या नोंदींचे पुस्तके दर दहा वर्षांनी लिहिली जातात.
 • गाव नमुना 12 हा पिकांसंबंधी आहे. गाव नमुना नंबर 12 मध्ये नोंदी घेताना हंगाम व पिकांच्या नोंद घेणे अभिप्रेत असते.
 • गाव नमुना नंबर असलेल्या रकान्यात पिकांच्या नोंदी लिहाव्यात व त्या खालील क्षेत्र लिहावे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters