केंद्र सरकारने (Central government) एक मोठे पाऊल उचलले आहे. ज्याचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. केंद्राच्या मोदी सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत लाभ घेतलेल्या 70 लाख कार्डधारकांना संशयितांच्या यादीत टाकले आहे.
केंद्र सरकारने हा डेटा ग्राउंड व्हेरिफिकेशनसाठी राज्यांशी शेअर करण्यात आला आहे. यावरून संशयितांच्या यादीत समाविष्ट असलेली नावे NFSA अंतर्गत रेशन मिळण्यास पात्र आहेत की नाही हे कळेल.
Money Plant: मनी प्लांट लावताना 'या' चुका करू नका; अन्यथा घरावर येईल संकट
याबाबत माहिती देताना अन्न सचिव सुधांशू पांडे (Food Secretary Sudhanshu Pandey) म्हणाले की, "2013 ते 2021 या कालावधीत 4.74 कोटी शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच यावेळी 70 लाख शिधापत्रिकाधारकांना संशयितांच्या यादीत ठेवण्यात आले आहे. या डेटाबाबत योग्य माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.
शेतकरी मित्रांनो गायीच्या गोमूत्राचा शेतीत अशाप्रकारे वापर करा; मिळेल भरघोस उत्पन्न
या 70 लाखांपैकी 50 ते 60 टक्केही चुकीचे आढळल्यास त्यांच्या जागी नवीन पात्रांना संधी दिली जाईल, असेही पांडे म्हणाले. गेल्या 9 वर्षांत रद्द करण्यात आलेल्या 4.74 कोटी शिधापत्रिकांचा सुमारे 19 कोटी लोकांना फायदा झाला आहे. या शिधापत्रिका (ration card) रद्द केल्यानंतर त्यांच्या जागी नवीन पात्रांची नावे जोडण्यात आली.
महत्वाच्या बातम्या
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! गव्हाच्या किमतीत होणार 'इतकी' वाढ; जाणून घ्या
शेतकऱ्यांनो सर्वात कमी कालावधीचे 'हे' पीक करेल मालामाल; जाणून घ्या लागवडीविषयी
Cultivation Walnuts: अक्रोडची लागवड अशा प्रकारे केल्यास मिळेल दुप्पट उत्पन्न; जाणून घ्या सविस्तर
Share your comments