1. बातम्या

मनरेगाच्या संपूर्ण बजेटपैकी ६६ टक्के रक्कम कृषीवर खर्च – केंद्रीय कृषीमंत्री

KJ Staff
KJ Staff


कोरोना व्हायरसमुळे (corona virus) देशात लागू असलेल्या लॉकडाऊनदरम्यान शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत केली जात आहे.  याविषयीची माहितीमोदी सरकारमधील केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली.  पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत २४ मार्च ते २७ एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १७ हजार ९८६ कोटी रुपये टाकण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.  ही योजना जेव्हा सुरु करण्यात आली तेव्हापासून साधारण ९.३९ कोटी शेतकरी कुटुंबाना ७१ हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत.

यापुर्वी कोणत्याच सरकारने शेतकऱ्यांसाठी असे काम केले  केले नाही किंवा कुठल्याच प्रकारची मदत केली नाही असे तोमर म्हणाले.  एका प्रश्नाला उत्तर देताना तोमर म्हणाले की, ग्रामिण विकासासाठी ग्रामिण विकास मंत्रालय असून या मंत्रालयामार्फत विकासासाठी प्रयत्न केले जात असतात.  मनरेगा योजनेंतर्गत देशात साधरण १२ कोटी रोजगार कार्ड ग्रामिण क्षेत्रात वाटण्यात आले आहेत.  या मनरेगा योजनेसाठी मे आणि येत्या जून महिन्यासाठी २० हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

ज्या लोकांना मनरेगाच्या रक्कम बाकी होती त्यांना एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच ही राशी देण्यात आली होती.  जेणेकरून शेतकऱ्यांना लॉकडाऊनच्या काळात आर्थिक अडचण भासू नये. ७० लाख जणांना रोजगार मिळाला असून पुढील कामांसाठी राज्यांना  ३३ कोटी रुपये देण्याची तरतुद देखील करण्यात आली आहे.  यामुळे राज्यांना चिंता करण्याची गरज नाही.  मनरेगा अंतर्गत २४४ कामांपैकी १२२ कामे ही कृषीशी संबंधित असतात. ज्यावर मनरेगाच्या संपूर्ण बजेटपैकी ६६ टक्के रक्कम खर्च करण्यात आली आहे.
 

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters